News Flash

‘लुटेरा’साठी घेतली ‘लिबर्टी’

ओ हेन्रीच्या ‘द लास्ट लीफ’वर बेतलेली कथा आणि रणवीर सिंग-सोनाक्षी सिन्हा अशी वेगळी जोडी यामुळे ‘लुटेरा’ चित्रपट हा गर्दीतल्यांपेक्षा वेगळा असणार आहे. कथाच मुळी थोडी

| March 17, 2013 12:32 pm

ओ हेन्रीच्या ‘द लास्ट लीफ’वर बेतलेली कथा आणि रणवीर सिंग-सोनाक्षी सिन्हा अशी वेगळी जोडी यामुळे ‘लुटेरा’ चित्रपट हा गर्दीतल्यांपेक्षा वेगळा असणार आहे. कथाच मुळी थोडी जुन्या काळातील असल्याने नायक-नायिकांचा लूक, एकंदरीत चित्रपटातील वातावरणही जुना काळ दाखवणारे आहे. प्रेक्षकांच्या मनात पहिल्यापासूनच या क थेने रुंजी घालावी, यासाठी दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवणे आणि निर्मात्यांनी एकेक शक्कल लढवायला सुरुवात केली आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यासाठी त्यांनी ‘लिबर्टी’ थिएटरची निवड केली आहे.
‘लिबर्टी’ हे मुंबईतील सर्वात जुने चित्रपटगृह आहे. १९४७ साली दक्षिण मुंबईत स्थापन झालेल्या या चित्रपटगृहात आजवरचे सगळे जुने हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले होते. या चित्रपटगृहाचे स्वरूप आणि त्या काळी त्याबद्दल असलेले आकर्षण लक्षात घेऊन ‘लुटेरा’साठी हवा तसा माहौल इथे तयार करता येऊ शकेल असा विचार करून मंडळींनी चित्रपटाच्या ट्रेलरसाठी ‘लिबर्टी’च हवे, असा निर्णय घेतला. आता या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी ‘लिबर्टी’ गाठण्याशिवाय पर्याय नाही. ‘लुटेरा’चे चित्रीकरण सुरू झाल्यापासून चित्रपट अनेक कारणांमुळे चर्चेत आहे.
पहिल्यांदा रणवीर आणि सोनाक्षीच्या प्रेमप्रकरणामुळे, मग प्रेमभंगामुळे, नायक-नायिका स्थिरस्थावर झाले तर डलहौसीच्या हिमवृष्टीमुळे चित्रपटाचा स्टुडिओच कोसळला.. या सगळ्या गोष्टींमुळे ‘लुटेरा’ चित्रपट कायम चर्चेत राहिला आहे. ‘उडान’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवणेकडून आणखी एका चांगल्या चित्रपटाची अपेक्षा नक्कीच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:32 pm

Web Title: liberty taken for lutera
टॅग : Entertainment
Next Stories
1 आधी मद्यपान; नंतर गीतगान
2 चौकटीपल्याडच्या नावीन्याचा ध्यास
3 मंगेशकरांचे गाणे, नक्षत्रांचे देणे!
Just Now!
X