News Flash

निर्दोष सुटलेल्यांना उच्च न्यायालयात शिक्षा

मामाच्या खुनाच्या आरोपातून जिल्हा सत्र न्यायालयाने मुक्त केलेल्या तिघा भावांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

| November 22, 2013 01:59 am

मामाच्या खुनाच्या आरोपातून जिल्हा सत्र न्यायालयाने मुक्त केलेल्या तिघा भावांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याचसंदर्भात जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिलेल्या एकाची याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळली.
शहानवाज अलीयावर अली मिर्झा (वय ४१), जावेद अलीयावर अली मिर्झा (३३) व सिगवा अलीयावर अली मिर्झा (३९, तिघेही रा. गेवराई, बीड) या तिघांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. तर जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिलेला चौथा भाऊ सिकंदर अलीयावर अली मिर्झा याची याचिका फेटाळली. न्या. के. यू. चांदीवाल व न्या. ए. आय. एस. चिमा यांनी या खटल्याचा निकाल दिला.
खटल्याची पाश्र्वभूमी अशी, चौघे भाऊ व त्यांचा मामा सर्फराज (४५, रा. जामखेड) यांचा रस्त्यावर चष्मे, गॉगल विक्रीचा व्यवसाय होता. चौघे भाऊ सुरुवातीला बीडमध्ये तर सर्फराज नगर शहरात व्यवसाय करत होते. नंतर हे चौघे भाऊ नगर शहरात व्यवसायासाठी आले. त्यावरून चौघांचे मामा सर्फराज याच्याशी व्यावसायिक वाद सुरुरू झाले. त्यातूनच चौघांनी ११ जानेवारी २०१० रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास मनमाड रस्त्यावरील विळद घाटात चौधरी ढाब्यामागे सर्फराज याच्या मानेवर चाकूने वार करून खून केला.

या घटनेचे सादिक हुसेन मजलुम हुसेन जाफ्री व जाफर अली किस्मत अली हे दोघे साक्षीदार होते. नगरच्या एमआयडीसी पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीत अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने केवळ सिकंदर अली याने चाकूने वार केला, इतर तिघांनी नाही, त्यांनी केवळ सर्फराजला पकडून ठेवले होते, असे मत नोंदवत तिघांना आरोपातून मुक्त केले व केवळ सिकंदर अली यास जन्मठेपेची शिक्षा दिली. सरकारतर्फे सरकारी वकील रामदास गवळी यांनी काम पाहिले.
या निकालाविरुद्ध सरकारने तसेच मृत सर्फराजची पत्नी शारन फातिमा हुसेन (जामखेड) यांनी तर सिकंदरने जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 1:59 am

Web Title: life imprisonment to 3 brothers in case of uncles murder
टॅग : Life Imprisonment
Next Stories
1 सीईओविरुद्ध अविश्वासाचा इशारा
2 शेतीच्या वादातून पुतण्याचा खून, दोघांना अटक
3 मनसेची २७ उमेदवारांची यादी जाहीर
Just Now!
X