05 March 2021

News Flash

पतीच्या खुनाबद्दल बायको, मेव्हण्यासह तिघांना जन्मठेप

जमीन विक्रीच्या व्यवहारातून आलेली रक्कम लाटण्यासाठी युवकाचा खून केल्याच्या आरोपावरुन मांडवगण (ता. श्रीगोंदे) येथील त्याची पत्नी, मेव्हण्यासह तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची व ५ हजार रुपये दंडाची

| February 26, 2013 02:19 am

जमीन विक्रीच्या व्यवहारातून आलेली रक्कम लाटण्यासाठी युवकाचा खून केल्याच्या आरोपावरुन मांडवगण (ता. श्रीगोंदे) येथील त्याची पत्नी, मेव्हण्यासह तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा दिली. खटल्यात लहान मुलीने आईविरुद्ध दिलेली साक्ष महत्वाची ठरली.
जिल्हा न्यायाधीश आर. जी. वानखेडे यांनी आज या खटल्याचा निकाल दिला. पत्नी मनिषा रवींद्र हुंबे (वय ३०), मेहुणा संजय भगवान शिंदे (४२) व नितिन बबन शिंदे (३०, तिघेही रा. मांडवगण) या तिघांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. या तिघांनी रविंद्र संभाजी हुंबे (वय ३०) याचा लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून केल्याची फिर्याद होती. खटल्यात सरकारी वकिल जी. के. मुसळे यांनी काम पाहिले.
मांडवगण जवळील तांबेमळा येथे २९ एप्रिल २००९ रोजी घडलेल्या घटनेची पाश्र्वभुमी अशी- रविंद्र हा भोळसर स्वभावाचा होता. मांडवगण फाटय़ावर त्याच्या मालकीची गट क्र. ७७५ मध्ये १९ एकर जमीन होती. ती मनिषा, संजय व नितिन या तिघांनी संगनमत करुन विकली. परंतु त्याचे आलेले १९ लाख रु. रविंद्रला न देता ते आपसात वाटून घेतले. त्याची मागणी रविंद्र करत होता परंतु तिघे त्याला मारहाण करत. घटनेच्या दिवशीही याच कारणातून तिघांनी त्याच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केली, त्यात त्याचा मृत्यु झाला. ही घटना लहान मुलगी क्षितिजा हिने पाहिली व तिने न्यायालयात तिघांना ओळखले. रविंद्रची आई हिराबाई हुंबे हिने श्रीगोंदे पोलिसांकडे फिर्याद दिली होती. खटल्यात एकुण ११ साक्षीदार तपासण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2013 2:19 am

Web Title: life time jail to wife cousin for murdered of husband
Next Stories
1 रेल्वेच्या प्रश्नांवर दोन्ही खासदारांकडून अपेक्षा
2 आगामी वर्षांत समाधानकारक पाऊसपाणी
3 माहितीसाठी उपमहापौरांच्याही नशिबी संघर्ष
Just Now!
X