News Flash

‘जगणे सर्वासाठी व्हावे, मानवतेचे उल्लंघन नको’

मानवाचा जन्म त्याच्यापुरताच सीमित नसतो. तो सर्वासाठी आहे याची जाणीव ठेवून प्रत्येकाने जगले पाहिजे व जगत असताना ते जगणे सर्वासाठी असावे.

| May 23, 2013 01:15 am

मानवाचा जन्म त्याच्यापुरताच सीमित नसतो. तो सर्वासाठी आहे याची जाणीव ठेवून प्रत्येकाने जगले पाहिजे व जगत असताना ते जगणे सर्वासाठी असावे. मानवतेचे उल्लंघन झाल्यास तो मानव दानव होतो म्हणून कोणीही मानवतेचे उल्लंघन करू नये, असा संदेश राष्ट्रसंत डॉ. शिविलग शिवाचार्यमहाराज यांनी दिला.
शहरातील गंगाधाम येथे डॉ. शिविलग शिवाचार्यमहाराजांच्या सत्संगाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुख्य संयोजक सतीश मिरचे व संगीता मिरचे यांनी डॉ. शिवाचार्यमहाराजांचा सत्कार केला. महापौर स्मिता खानापुरे, माजी खासदार रूपाताई निलंगेकर, आमदार बाबासाहेब पाटील, नगरसेविका पूजा पंचाक्षरी, नगरसेवक शैलेश स्वामी, रविशंकर जाधव, यूपीएस परीक्षेत देशात २०वी आलेली क्षिप्रा आग्रे हिचा महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शिवकांत स्वामी यांनी केले. सविता पवार यांनी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2013 1:15 am

Web Title: live for humanity
टॅग : Live
Next Stories
1 नवरदेवासाठी साहित्यखरेदीस गेलेल्या दोघांचा अपघाती मृत्यू
2 अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न – स्मिता खानापुरे
3 आधी टगेगिरी, नंतर गांधीगिरी!
Just Now!
X