पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’, ‘लोकसत्ता’ आणि ‘टीजेएसबी बँक’ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा आयोजित करण्यात आलेल्या ‘इकोफ्रेंडली घरगुती गणपती सजावट स्पर्धे’चा पारितोषिक वितरण समांरभ येत्या शुक्रवारी, २१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होत आहे. यावेळी सांस्कृतिक मैफल रंगणार असून त्यात सगळ्यांना विनामूल्य प्रवेश आहे.
रंगस्वर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयासमोर, नरिमन पॉइंट येथे होणाऱ्या या समारंभास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचिव वल्सा नायर सिंग, सदस्य सचिव राजीवकुमार मित्तल, जनसंर्पक अधिकारी संजय भुस्कुटे, ‘टीजेएसबी’ बँकेचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन, उपाध्यक्ष भालचंद्र दाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश उतेकर तसेच स्पर्धेचे परीक्षक अविनाश कुबल (महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे उपसंचालक) आणि रविराज गंधे (कार्यक्रम अधिकारी सह्य़ाद्री वाहिनी) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  
या स्पर्धेतील ९,९९९ रुपयांचे प्रथम पारितोषिक विलेपार्ले येथील सतीश कोलवणकर यांना तर ६,६६६  रुपयांचे द्वितीय पारितोषिक ना. म. जोशी मार्ग येथील संतोष वर्टेकर यांना जाहीर झाले आहे.
प्रत्येकी २००१ रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिकेही (सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्रसह) या वेळी प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये अमेय वैद्य (सांताक्रूझ), अनंत शिंदे (घाटकोपर), अश्विनी मंजुरे (गोवंडी), अतुल काटदरे (बोरिवली), फाल्गुनी अशित (मालाड), गौरी घोणे (अंबरनाथ), किशोर पाटील (विरार), क्रांती पाटील (विरार), मधुरा जोशी (रत्नागिरी), मानसी नाईक (सांताक्रूझ), मयुर अजिंक्य (दहिसर), प्रज्ञा सहस्त्रबुद्धे (ठाणे), प्रफुल राज (दहिसर), प्रकाश जाधव (घाटकोपर), प्रसाद वेदपाठक (माहिम), रश्मी मतकरी (माहिम), संदेश पाटील (घाटकोपर), सुधाकर अंबोकर (भांडूप), उषा िशदे (दादर), विनोद घोलप (गोरेगाव), किरण पाधरपोटे (घाटकोपर), संजय कराड (मुलुंड), आनंद लेले (ठाणे), राजेश कुलकर्णी (डोंबिवली), सरिता गुजराती (बोरिवली ) यांचा समावेश आहे  
अधिक माहितीसाठी लोकसत्ता ब्रॅण्ड मार्केटिंग विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, दुसरा मजला, नरिमन पॉइंट येथे (दूरध्वनी ०२२-६७४४०३६९) या क्रमांकावर संपर्क साधावा.