News Flash

ठाण्यात कांदेपोहे ते मंगलाष्टक

एकरूप विवाह मंडळातर्फे ठाणे येथे येत्या पाच ऑक्टोबर रोजी ‘कांदेपोहे ते मंगलाष्टक’ या जोडीदार निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कल्याण येथे मे महिन्यात आयोजित

| September 27, 2014 12:19 pm

एकरूप विवाह मंडळातर्फे ठाणे येथे येत्या पाच ऑक्टोबर रोजी ‘कांदेपोहे ते मंगलाष्टक’ या जोडीदार निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कल्याण येथे मे महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादामुळे खास लोक आग्रहास्तव एकरूप विवाह मंडळाने पुन्हा एकदा ठाणे शहरामध्ये ब्राह्मण ज्ञातीतील विवाह इच्छुकांसाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे.
‘कांदेपोहे ते मंगलाष्टक’ या कार्यक्रमाद्वारे विवाह इच्छुक मुला-मुलींना सुप्रसिद्ध कलाकार आणि सूत्रसंचालक संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांच्या उपस्थितीत एका नावीन्यपूर्ण पद्धतीने जोडीदार निवडीची संधी मिळणार आहे. रविवारी ५ ऑक्टोबर रोजी गोखले मंगल कार्यालय, ठाणे येथे हा कार्यक्रम तीन सत्रांत होणार आहे. पहिल्या सत्रात सकाळी ९.३० वाजता पुनर्विवाह इच्छुकांसाठी हा कार्यक्रम असेल. दुसऱ्या सत्रात दुपारी २ वाजता ३५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील प्रथम वधू-वरांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या सत्रात  ३५ वर्षांच्या आतील प्रथम वधू-वरांसाठी निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बघण्याच्या पारंपरिक पद्धतीचा अवलंब करण्याऐवजी अत्यंत मोकळा आणि खेळीमेळीच्या वातावरणात परस्पर संवादातून सहजतेने मुला-मुलींना आपला भावी जोडीदार पारखता येणार आहे. तसेच मुलगा किंवा मुलगी यांना प्रत्यक्ष भेटून जाणून घेता येणार आहे. त्यामुळे जास्तीतजास्त ब्राह्मण विवाह इच्छुकांनी सशुल्क आगाऊ नोंदणी करून कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन एकरूप विवाह मंडळाच्या संचालिका अश्विनी पटवर्धन यांनी केले आहे. या कार्यक्रमासंबंधी अधिक माहितीसाठी मुख्य कार्यालय, ठाणे : ०२२-२५३७५७३३, किंवा कल्याण शाखा -९८७०७७२०७७ किंवा डोंबिवली शाखा – ९८६९१०५५७२.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 12:19 pm

Web Title: loksatta sponsor partner selection program in thane
टॅग : Loksatta
Next Stories
1 ५० हजारी रकमेवर पोलिसांचे लक्ष
2 दप्तराऐवजी टॅब!
3 कल्याणचा तरणतलाव उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
Just Now!
X