News Flash

लोकसत्ता यशस्वी भव एक उत्तम मार्गदर्शक – नसीम खान

मराठी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न वाटता स्वत:चा व स्वत:च्या भाषेचा अभिमानच वाटला पाहिजे व यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या प्रत्येक उपक्रमात आमचा

| January 17, 2013 12:34 pm

मराठी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न वाटता स्वत:चा व स्वत:च्या भाषेचा अभिमानच वाटला पाहिजे व यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या प्रत्येक उपक्रमात आमचा सहभाग नेहमीच असेल, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग व अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांनी केले.
चांदिवली विधानसभा क्षेत्रामधील शिवाजी विद्यालय व लोकमान्य विद्यालय यांमध्ये ‘लोकसत्ता यशस्वी भव’च्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लोकसत्ता ‘यशस्वी भव’च्या तज्ज्ञ शिक्षिका सुप्रिया अभ्यंकर यांनी विद्यार्थ्यांना शेवटच्या क्षणी विज्ञान व गणित विषयांचा उपयोगात्मक अभ्यास कसा करावा, याबाबत विशेष मार्गदर्शन केले.शिवाजी विद्यालयामध्ये आयोजित झालेल्या कार्यक्रमास शिवाजी शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष अप्पा विष्णू परब, संचालक विजयकांत आवले, जन. सेक्रेटरी रमेश भोसले, सेक्रेटरी पांडुरंग शेतके व शिशू विकास विद्यालयाचे संस्थापक रविकांत अणावकर व मुख्याध्यापक तळेले, ‘लोकसत्ता’चे प्रसाद मोकाशी उपस्थित होते.
या वेळी शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा यादव यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. या कार्यक्रमास शिशुविकास व कशची हायस्कूलचे विद्यार्थीदेखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन सुनीता पोतदार यांनी केले.
लोकमान्य विद्यालयामधील कार्यक्रमास लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय घाग, सचिव अनुराधा घाग, तेरेसा हायस्कूल, समता विद्यालय व सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची रूपरेखा व ओळख लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक गाडगीळ यांनी केली, तर निवेदन सुलक्षणा कदम यांनी केले. या वेळी तालुका काँग्रेस पदाधिकारी खोत मॅडम, सत्यनारायण पांडे व अण्णा परब यांनी सहकार्य केले. या वेळी नसीम खान यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ‘यशस्वी भव’ या दहावी मार्गदर्शनपर पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 12:34 pm

Web Title: loksatta yashvibhava is the good instructor nasim khan
Next Stories
1 राज्य सरकारच्या कासवगतीमुळे फेरीवाला धोरण शीतपेटीत
2 कारवाईचा नुसताच देखावा!
3 सनी लिओनी सिद्धिविनायकाच्या दारी..
Just Now!
X