06 July 2020

News Flash

हैदराबाद बँकेच्या शाखेत साडेअकरा लाखांची लूट

स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या अंदोरा शाखेतून (तालुका कळंब) ११ लाख ४५ हजार ११० रुपयांची रोकड चोरटय़ांनी लांबविली. गॅस कटरच्या साहाय्याने बँकेतील तिजोरी फोडून ही लूट

| January 28, 2014 01:35 am

स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या अंदोरा शाखेतून (तालुका कळंब) ११ लाख ४५ हजार ११० रुपयांची रोकड चोरटय़ांनी लांबविली. गॅस कटरच्या साहाय्याने बँकेतील तिजोरी फोडून ही लूट करण्यात आली. प्रजासत्ताकदिनी हा प्रकार उघडकीस आला. कळंब शहरातच अन्य एका घरफोडीत ६७ हजारांचा ऐवज लुटण्यात आला.
सुमारे चार हजार लोकवस्तीच्या अंदोरा गावात स्टेट बँक ऑफ हैदराबादची शाखा आहे. शनिवारी बँकेला दुपारनंतर सुटी होती. दुपारी तीनच्या सुमारास कर्मचारी बँक बंद करून निघून गेले. त्याच रात्री चोरटय़ांनी बँकेच्या समोरील शटर उचकटून कुलूप तोडले. बँकेतील लोखंडी तिजोरी गॅस कटरने तोडून तिजोरीतील ११ लाख ४५ हजार ११० रुपयांची रोकड हातोहात पळविली. बँकेचे शटर उचकटलेले असल्याचे शाखा व्यवस्थापक प्रकाश देशपांडे यांच्या सकाळी निदर्शनास आले. त्यांनी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला. याच दिवशी गावातील शेतकऱ्यांच्या वीजमोटारीही चोरीस गेल्याचे अनेकांनी सांगितले.
कळंब शहरात घरफोडी
कळंब शहरात शनिवारी रात्री चोरटय़ांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व ६७ हजारांची रोकड असा मुद्देमाल लांबविला. मार्केट यार्ड भागातील विष्णू मंडाळे हे कुटुंबीयांसह लग्नकार्यासाठी नाशिकला गेले होते. घरात कोणीच नसल्याचे पाहून चोरटय़ांनी डाव साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2014 1:35 am

Web Title: loot of 11 50 lakhs in hyderabad bank branch
टॅग Osmanabad,Theft
Next Stories
1 वृत्तपत्र वितरक सक्षम होणे गरजेचे- डॉ. वाघमारे
2 ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात गोंधळ; पाच जणांवर गुन्हा
3 औरंगाबादेत ३०पासून पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
Just Now!
X