यावर्षी राष्ट्रीय पर्यावरण जागृती महिना देशभर साजरा करण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून सामाजिक वनीकरण, कोल्हापूर (हरितसेना), निसर्गमित्र, जीवनमुक्ती व पर्यावरणप्रेमी संस्थेतर्फे ‘सह्य़ाद्री वाचवा’ मोहिमेंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
करवीर, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा, भुदरगड, आजरा चंदगड, गगनबावडा तालुक्यातील देवराई संवर्धन जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्याशी चर्चा, कृती आराखडा तयार करणे व शाळा, महाविद्यालयामध्ये देवराई वाचवू या विषयी स्लाईड शोचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच संभाव्य आपत्ती व्यवस्थापनाविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात येणार आहे. तसेच संभाव्य आपत्ती व्यवस्थापनाविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात येणार आहे. व देवराई परिसरातील महत्त्वाची वृक्ष संगोपन व संवर्धनासाठी भेट देण्यात येणार आहेत.
पर्यावरणमासाच्या कालावधीत प्रत्येक रविवारी स’ााद्रीतील देवराई व शिवार भेटीचे आयोजन. पर्यावरण मासाच्या कालावधीत प्रत्येक शनिवारी सायंकाळी ६ वाजता निसर्गविषयक फिल्म शोचे आयोजन, तसेच १३ ते १८ डिसेंबरदरम्यान ‘सह्य़ाद्री वाचवा’ ‘देवराई वाचवा’ विषयाचे छायाचित्र व माहिती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आह.े शाहुपुरीतील दलित मित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालयात होणारे हे कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य खुले आहेत.