मदुराई-डेहराडून व चंदीगड-मदुराई एक्सप्रेस आता नागपूर मार्गे द्विसाप्ताहिक धावणार असल्याच्या निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या गाडीचे थांबे राजकोट, वाकानेर, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, सुरत, नंदूरबार, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, राजनांदगाव व दुर्ग येथे देण्यात आले आहेत.
मदुराई-डेहराडून गाडी क्र. १२६८७-२२६८७ ही चंदीगड एक्सप्रेस मदुराईवरून रविवारी, ३० मार्चपासून बुधवार व रविवार या दिवशी द्विसाप्ताहिक धावणार आहे. सध्या ही गाडी बुधवार या दिवशीच सुरू आहे. या गाडीचे प्रत्येक शुक्रवार व मंगळवारी बल्लारशा येथे १२.३० वाजता आगमन होईल व १२.४० वाजता प्रस्थान होईल. सेवाग्रामला दुपारी २.३५ वाजता आगमन व २.३६ वाजता प्रस्थान होईल. तसेच ३.४० वाजता नागपूरला आगमन व ३.५० वाजता प्रस्थान होईल. १२६८८-२२६८८ डेहराडून, चंदीगड-मदुराई एक्सप्रेस डेहराडून चंदीगड येथून शुक्रवारी ४ एप्रिलपासून ही गाडी सोमवार व शुक्रवारी द्विसाप्ताहिक धावणार आहे.
 सध्या ही गाडी सोमवार या दिवशीच सुरू आहे. या गाडीचे प्रत्येक मंगळवारी व शनिवारी नागपूरला सकाळी ८.३० वाजता आगमन होईल व ८.४० ला प्रस्थान होईल. सेवाग्रामला ९.३९ वाजता आगमन व ९.४१ वाजता प्रस्थान, चंद्रपूरला ११.१८ वाजता आगमन व ११.२० वाजता प्रस्थान तसेच बल्लारशाला ११.५० वाजता आगमन व १२ वाजता प्रस्थान होईल. या गाडीचा थांबा व वेळेत कोणताही बदल करण्यात आला नाही.
प्रवाशांची गर्दी लक्षात घेता हापा-रायपूर दरम्यान नागपूर मार्गे जाणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडीच्या २६ अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे. ही गाडी १ एप्रिलपासून २४ जूनपर्यंत प्रत्येक मंगळवारी (एकूण १३ फेऱ्या) रात्री ९ वाजता सुटणार असून रायपूरला तिसऱ्या दिवशी गुरुवारी ३ वाजता पोहचेल. या गाडीचे २ एप्रिल ते २५ जूनपर्यंत प्रत्येक बुधवारी वर्धेला ७.३२ वाजता आगमन, तर प्रस्थान २.३४ वाजता होईल. नागपूरला ८.४० वाजता आगमन, तर ८.५० वाजता प्रस्थान होईल. ०९५३५ क्रमांकाची हापा विशेष साप्ताहिक गाडी रायपूर येथून ३ एप्रिल ते २६ जूनपर्यंत प्रत्येक गुरुवारी (एकूण १३ फेऱ्या) ४.१० वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ३.२५ वाजता आगमन होईल. या गाडीचे ३ एप्रिल ते २६ जूनपर्यंत प्रत्येक गुरुवारी नागपूरला १०.५५ वाजता आगमन, तर ११.०५ वाजता प्रस्थान व वर्धा येथे १२.०२ वाजता आगमन तसेच १२.०५ वाजता प्रस्थान होईल. या गाडीचे थांबे राजकोट, वाकानेर, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, सुरत, नंदूरबार, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, राजनांदगाव व दुर्ग येथे देण्यात आले आहेत. या गाडीला एकूण १७ डबे असून यात १ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, शयनयान, ६ साधारण द्वितीय श्रेणी व २ एसएलआर डबे राहणार आहेत.