राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या (नॅक, बंगलोर) केंद्रीय समितीच्या वतीने निलंगा येथील महाराष्ट्र शिक्षण समितीच्या महाराष्ट्र महाविद्यालयाला नुकताच बी श्रेणी प्रदान करण्यात आली.
उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी, तसेच महाविद्यालयाची भौतिक व गुणात्मक प्रगती व्हावी, या साठी ५ वर्षांतून एकदा नॅक समितीच्या वतीने महाविद्यालयाचे मूल्यांकन केले जाते.
सन २००४ मध्ये महाराष्ट्र महाविद्यालयाचे मूल्यांकन झाले. मागील वर्षी पुनर्मूल्यांकन करण्यात आले. नॅक परिषदेच्या केंद्रीय समितीने महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक सोयी, विद्यापीठीय परीक्षांचे निकाल, ग्रंथालय, कार्यालयीन सेवा, प्राध्यापकांची गुणवत्ता व संशोधनकार्य, विस्तारकार्य, नावीन्यपूर्ण उपक्रम, अभ्यासक्रम निर्मितीतील सहभाग, सुसज्ज इमारत व क्रीडांगण आदी बाबींचे मूल्यमापन करून महाविद्यालयास ‘बी’ श्रेणी दिली.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत पातळीवरील सातवे व लातूर जिल्ह्य़ात पुनर्मूल्यांकन केलेले हे दुसरे महाविद्यालय आहे. नॅक पुनर्मूल्यांकनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एल. एरंडे, समन्वयक डॉ. आर. डी. कांबळे व सदस्य यांनी काम के ले.
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग दिला.