ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालयाच्या ६० व्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवास उद्या (रविवारी) प्रारंभ होत असून, २४ मार्चपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्री यात्रा महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष आमदार दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सिद्धेश्वर मंदिरात परंपरेनुसार गौरी समाजबांधवांतर्फे मध्यरात्री सिद्धेश्वरास दुधाचा अभिषेक होणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा यांच्या हस्ते विधिवत महापूजा होऊन सकाळी ८ वाजता ध्वजारोहण होणार आहे. यात्रा कालावधीत कृषी पशुप्रदर्शन, महिला बचत गटाने निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन-विक्री, दुग्धाभिषेक आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आनंदमेळा या यात्रेचे खास आकर्षण असणार आहे. यात्रेसाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दि. २४ ला कुस्त्यांचा फड रंगणार आहे. सायंकाळी शोभेच्या दारूची आतषबाजी होऊन महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचा समारोप होईल. १५ दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवाचा सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहन सिद्धेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे पदाधिकारी विक्रम गोजमगुंडे, मन्मथअप्पा लोखंडे आदींनी केले आहे.

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन
Sri Swami Samarth Maharaj s prakat din Celebrations to Commence in Akkalkot with Religious and Cultural Programs
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रम