21 January 2020

News Flash

अश्लील संदेश पाठविणारा पोलिसांच्या जाळय़ात

कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना मोबाइलवरुन अश्लील संदेश पाठविणाऱ्या तरुणाला वाशी पोलिसांनी अटक केली आहे.

| August 28, 2015 02:05 am

कंपनीतील महिला  कर्मचाऱ्यांना मोबाइलवरुन अश्लील संदेश पाठविणाऱ्या तरुणाला वाशी पोलिसांनी अटक केली आहे.
वाशीमधील एका खासगी कंपनीतील तरुणीला मोबाइलवरून अश्लील संदेश पाठविले जायचे. असा प्रकार आणखी अन्य महिलांसोबतदेखील घडू लागल्याने या महिलांनी कंपनी व्यवस्थापनाकडे याविरोधात तक्रार केली. अखेर व्यवस्थापनाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून तपास सुरू केला.  तपासात एकाच वेळी चार तरुणांची नावे समोर आल्याने पोलिसदेखील चक्रावले. या घटनेत मोस्ट कॉलर सुविधेचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे मूळ आरोपी पोलिसांना मोठय़ा प्रयत्नाअंती हाती लागला. महिलांना अश्लील संदेश पाठविणारा मोबाइल क्रमांक आणि मोबाइलधारक आरोपी संदीप दुबे यांनी शैलेश टकले यांचा मोबाइल क्रमांक वापरून हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीने बनावट कागदपत्रे सादर करून घेतलेला मोबाइल जगदीश निचेते या नावाने घेतला होता. मात्र पोलीस तपासात या नावाची व्यक्ती नसल्याचे आढळून आले. पोलिसांना या तपासात मयूर कृपलानी या तरुणाचे नाव समोर आल्यावर पोलिसांनी या तरुणाची चौकशी केली. या वेळी आरोपी तीन वेगवेगळय़ा नावांनी वावरत असल्याचे पोलिसांना आढळून आल्यावर पोलिसांनी मोबाइल सीडीआर आणि मोबाइल टॉवर लोकेशनवरून आरोपी संदीप दुबे याच्या मुसक्या आवळल्या.  अधिक तपास पोलीस करीत आहेत.

First Published on August 28, 2015 2:05 am

Web Title: man arrested for sending porn sms
Next Stories
1 गणेशोत्सवानिमित्त उरणमधून एस.टी.च्या जादा बसेस
2 नगरसेवकांचा ‘गोंधळ’; सभागृहाचे कामकाज दोन तास ठप्प
3 थकबाकी वसुली आणि प्रस्तावित विकास कामांनी आर्थिक स्थिती सुधारणार – आयुक्त
Just Now!
X