News Flash

मांजरपाडा प्रकल्पास लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता

महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी मांजरपाडा प्रकल्पाव्दारे गोदावरी खोऱ्यात वळविले जाणार असून या महत्वाकांक्षी

| March 14, 2015 06:52 am

महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी मांजरपाडा प्रकल्पाव्दारे गोदावरी खोऱ्यात वळविले जाणार असून या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या रखडलेल्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने दिली जाईल, अशी ग्वाही विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावर छगन भुजबळ यांनी मांजरपाडा प्रकल्पास सुधारित मान्यता देण्याची मागणी केली होती.
उध्र्व गोदावरी प्रकल्पातंर्गत मांजरपाडा वळण योजनेव्दारे नाशिक जिल्ह्य़ातील पाणलोट क्षेत्रातील पश्चिमवाहिनी नद्यांचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविले जाण्याची योजना आहे. या प्रकल्पातील ८.९६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे ८६ टक्के तर धरण व सांडव्याचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
या प्रकल्पाचे १०० दशलक्ष घनफुट   पाणी स्थानिकांना मिळणार आहे. ६०६ दशलक्ष घनफुट पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे.
या योजनेसाठी २०१४-१५ वर्षांत ७० कोटी अनुदान मंजूर आहे. केवळ शासनाकडून अनुदान खर्चाला मान्यता नसल्यामुळे काम ठप्प झाले असल्याचे भुजबळ यांनी सांगितले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वपूर्ण असल्याने या प्रकल्पाचे काम बंद पडू न देता लवकरच त्याच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2015 6:52 am

Web Title: manjarpada project
टॅग : Nashik
Next Stories
1 बाल लैंगिक शोषणाविरोधातील कायद्याविषयी कार्यशाळेतून मार्गदर्शन
2 पोलीस आयुक्त सरंगल यांचा दरारा कुठे गेला ?कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा
3 ‘त्या’ कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशी कामावर बोलविण्याचा वाद..
Just Now!
X