07 March 2021

News Flash

निराधार झालेल्या मुलांना अनेकांकडून मदतीचा हात

जीवनयात्रा संपविणाऱ्या औंढा नागनाथ तालुक्यातील जलालदाभा येथील शिवाजी खंदारे व इंदूबाई खंदारे दाम्पत्याच्या तीन मुली व मुलगा निराधार झाला. आमदार सातव यांनी मदतीचा

| June 12, 2013 01:50 am

बेरोजगारीला कंटाळून जीवनयात्रा संपविणाऱ्या औंढा नागनाथ तालुक्यातील जलालदाभा येथील शिवाजी खंदारे व इंदूबाई खंदारे या दाम्पत्याच्या तीन मुली व एक मुलगा निराधार झाला. आमदार राजीव सातव यांनी या मुलांना आर्थिक मदतीचा हात देताना आश्रमशाळेत प्रवेश देण्याच्या सूचना दिल्या.
खंदारे पती-पत्नीच्या आत्महत्येनंतर त्यांची चार मुले निराधार झाली. त्यांच्यासमोर जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थांनी गावात मदतफेरी काढून अन्नधान्य गोळा केले. या वेळी जमलेले ९ हजार रुपये त्यांना दिले. औंढा नागनाथ पंचायत समिती सभापती संगीता लोंढे, आदिवासी युवक कल्याण संघाचे अध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते यांनीही आर्थिक मदत केली. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार राजीव सातव यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गावाला भेट देऊन या मुलांना ४५ हजार रुपयांची मदत केली. तसेच मुलांना आश्रमशाळेत प्रवेश देण्याच्या सूचना केल्या. विलास गोरे, बाबुरा पोले हे या वेळी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2013 1:50 am

Web Title: many helping hand for unsupported childrens
Next Stories
1 ‘धस’ मुसळेपणा!
2 विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत जॅक हेल्पलाइनची मदत
3 अधिकाऱ्यांना शाळेत कोंडून १०२ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
Just Now!
X