News Flash

मराठी कलाकारांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

शहरातील गंगापूर रस्त्यावरील शंकरनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात ‘मिस् मॅच’ या मराठी चित्रपटातील कलाकारांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन केले.

| November 21, 2014 12:27 pm

शहरातील गंगापूर रस्त्यावरील शंकरनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात ‘मिस् मॅच’ या मराठी चित्रपटातील कलाकारांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन केले.
श्री साईबाबा मंदीर ट्रस्ट येथे अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर, दिग्दशक अलोक श्रीवास्तव व इतर कलाकारांनी उपस्थिती लावली. मंदिराचे अध्यक्ष भुवनेश कडलग यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थितांशी कलाकारांनी संवाद साधला.
उपस्थितांनी चित्रपटाविषयी काही प्रश्न विचारले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना भूषण प्रधान यांनी आपल्याला ज्या क्षेत्रात कारकीर्द करायची ते क्षेत्र प्रथम निश्चित करण्याचा सल्ला दिला.
शिक्षण पूर्ण करून मगच चित्रपट क्षेत्रात येण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी अरूण काळे, सुधाकर पुंडे, बाळासाहेब धामणे, निलिमा शिंदे, माणिक गायकर, शारदा फुटे आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2014 12:27 pm

Web Title: marathi actors guidance for students in nashik
Next Stories
1 चोरीच्या कारची विक्री करणाऱ्या तिघांना अटक
2 काही नगरसेवक सक्रिय, तर काही निष्क्रिय
3 चोरटय़ांचा धुमाकूळ
Just Now!
X