चांद्यापासून बांद्यापर्यंत पसलेलल्या महाराष्ट्रात तसेच सीमाभागांतील मराठी लोकांनी जपलेली संस्कृती याचे अनोख्या पद्धतीने दर्शन घडविणारा ‘मराठीच्या पाऊलखुणा’ हा कार्यक्रम ९ व १० फेब्रुवारी असे दोन दिवस शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमाची मूळ संकल्पना श्रावण डावरे यांची असून दामिनी पवार यांची निर्मिती आहे. हा कार्यक्रम लोकमान्य मल्टिपर्पज सहकारी सोसायटीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला असून यामध्ये ६० कलाकार अभंग, भारूड, वाघ्या-मुरळी, गवळण, लावणी, धनगर गाणी, वासुदेव, शेतकरी गाणी याबारबरोच लोककलांमधील छबिना आणि तारपा नृत्य हेही यात सादर करतील. शनिवारी दुपारी ३ वाजता तर रविवारी रात्री ८ वाजता हा कार्यक्रम होणार असून सर्व रसिकांसाठी खुला आहे.