माथाडी कामगारांचे प्रश्न त्वरित सोडविले गेले नाही, तर जुलैमध्ये होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेवर, हमाल-माथाडी कामगारांचा प्रचंड मोर्चा काढला जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष व मराठवाडा लेबर युनियनचे अध्यक्ष सुभाष लोमटे यांनी दिला.
माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा, संपलेले वेतन करार तत्काळ पूर्ण करा, करार फक्त २ वर्षांचे करा, काढलेल्या कामगारांना त्वरित कामावर घ्या, हमाल कष्टकऱ्यांना पेन्शन व दोन रुपये किलोने धान्य द्या इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चा गुलमंडी-शहागंजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाचे नेतृत्व सुभाष लोमटे, सुभाष गायकवाड, सुधीर देशमुख व देविदास कीर्तिशाही यांनी केले. मोर्चानंतर शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांना मागण्यांचे निवेदन दिले.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी