News Flash

महिलेचा गळा आवळून खून; पती व नणंदेला अटक

माहेराहून ५० हजार रुपये घेऊन न आल्याचा मनात राग धरून पतीने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना शहरातील प्रबोध नगरमध्ये घडली.

| October 14, 2012 11:02 am

माहेराहून ५० हजार रुपये घेऊन न आल्याचा मनात राग धरून पतीने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना शहरातील प्रबोध नगरमध्ये घडली. या प्रकरणी पती अनिल नारायण कांबळे व मीना कांबळे या दोघा बहीण-भावांना नवा मोंढा पोलिसांनी अटक केली. औंढा तालुक्यातील जलालपूर येथील सुरेश रामभाऊ भडगळ यांची बहीण कंचना हिचा विवाह पाच वर्षांपूर्वी प्रबोधनगरमधील अनिल कांबळे याच्याशी झाला. अनिल हा घरांना रंग देण्याचे काम करतो. गेल्या काही महिन्यांपासून अनिल पत्नी कंचनाला माहेराहून ५० हजार रुपये घेऊन ये म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. गुरुवारी रात्री कंचना हिस अनिलने मारहाण केली व शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घरामध्येच कंचनाच्या गळ्याला दोर लावला.
यात कंचनाचा जागीच मृत्यू झाला. मृत कंचनाचा भाऊ सुरेश भडगळ यांच्या तक्रारीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात अनिल कांबळे व मीना कांबळे या दोघा भाऊ-बहिणीविरुद्ध विवाहितेचा छळ व खून या आरोपाखाली शुक्रवारी रात्री नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा पोलिसांनी या दोघांना अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2012 11:02 am

Web Title: marder crime police
Next Stories
1 नांदेड-वाघाळा महापालिकेचे आज मतदान
2 सीमा भागातील अपंग, मूकबधिर, मतिमंद शाळेचे स्थलांतर उच्च न्यायालयाने रोखले
3 परभणीत ९० हजारांचा गुटखा जप्त
Just Now!
X