इचलकरंजी येथील नवविवाहितेने सोमवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली. अनिता कैलासतौर असे तिचे नाव आहे. याबाबत मंगळवारी गावभाग पोलीस ठाण्यामध्ये पती कैलास तौर याने वर्दी दिली आहे. पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. अनिता तौर (वय २३) ही मूळची जालना जिल्ह्य़ातील सावरगाव येथील आहे. तिचा विवाह कैलास तौर याच्याशी सन २००७ मध्ये झाला होता. कैलास याला गेल्या काही महिन्यापासून दारूचे व्यसन जडले होते. अलीकडेच या उभयतांनी शहापूर भोईनगर येथील मोहन खंडागळे यांच्या भाडय़ाच्या घरात राहण्यास सुरुवात केली होती. गाव बदलले तरी पतीचे दारूचे व्यसन सुटत नव्हते. यामुळे निराश झालेल्या अनिताने घराच्या स्लॅबला साडीने गळफास लावून आत्महत्या केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2013 1:30 am