News Flash

भोळसर विवाहितेवर सलग २ दिवस सामूहिक अत्याचार

पतीपासून चुकल्याने माहेरी निघालेल्या भोळसर महिलेवर मदतीच्या बहाण्याने तरुणाने शेतात नेऊन बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी त्याच्या दोन साथीदारांनी महिलेच्या असाहायतेचा फायदा घेत अत्याचार केला.

| September 28, 2013 01:58 am

पतीपासून चुकल्याने माहेरी निघालेल्या भोळसर महिलेवर मदतीच्या बहाण्याने तरुणाने शेतात नेऊन बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी त्याच्या दोन साथीदारांनी महिलेच्या असाहायतेचा फायदा घेत अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस येताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन गुरुवारी रात्री या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
सामूहिक अत्याचाराची घटना उघड झाल्यानंतर आरोपींच्या शोधास पोलिसांनी ६ पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठविली. लवकरच आरोपींना ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी दिली. बीड तालुक्यातील िपपळनेर माहेर असलेली २० वर्षीय विवाहिता ३ दिवसांपूर्वी वडवणीस पतीबरोबर आली होती. मात्र, पती-पत्नीची चुकामूक झाली. भोळसर असलेली ही महिला सायंकाळच्या सुमारास माहेरी निघाली होती. मात्र, गैरफायदा घेत तरुणांनी तिच्यावर अत्याचार केला.
केसापुरी (परभणी) येथील तरुणाने गावाकडे सोडतो, असे सांगून दुचाकीवरून तिला शेताकडे नेले. तेथे अत्याचार केला. रात्रभर ही महिला कोठय़ातच राहिली. दुसऱ्या दिवशी दोन तरुणांनी पुन्हा अत्याचार केला. तिसऱ्या दिवशी (शुक्रवारी) या नराधमांच्या तावडीतून सुटत ही महिला वडवणीत आली व अत्याचाराची माहिती नागरिकांना दिली. त्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. रात्री उशिरा अधीक्षक मंडलिक, अतिरिक्त अधीक्षक माधव कारभारी यांनी िपपळनेर पोलीस ठाणे गाठले. रात्री उशिरापर्यंत अत्याचारित महिलेचा जबाब घेतल्यानंतर जािलदर तांगडे, मिच्छद्र तांगडे व मोहन तांगडे (केसापुरी, परभणी) या तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी ६ पथके तयार करून रवाना झाली. आरोपींचे आई-वडील व नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या अटकेसाठी निकराचे प्रयत्न सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 1:58 am

Web Title: married women gang raped for two days
Next Stories
1 मराठा आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानी नसेल – सुळे
2 बहुश्रुत, व्यासंगी!
3 दोन्ही काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांशी माजी मुख्यमंत्री चव्हाणांची चर्चा
Just Now!
X