News Flash

‘लोकसत्ता’तर्फे ‘माझं देवघर’ स्पर्धा

‘कार्पेट’, ‘बिल्टअप’ आणि ‘सुपर बिल्टअप’च्या आजच्या जमान्यात स्वयंपाकघर जेमतेम स्वयंपाकाचा ओटा आणि फ्रीजच्या जागेपुरतं उरलं आहे. आधुनिक घरात हॉल, बेडरूम आणि टॉयलेट-बाथरूमचा विचार केलेला असतो.

| September 4, 2014 06:29 am

‘कार्पेट’, ‘बिल्टअप’ आणि ‘सुपर बिल्टअप’च्या आजच्या जमान्यात स्वयंपाकघर जेमतेम स्वयंपाकाचा ओटा आणि फ्रीजच्या जागेपुरतं उरलं आहे. आधुनिक घरात हॉल, बेडरूम आणि टॉयलेट-बाथरूमचा विचार केलेला असतो. श्रीमंतांच्या घरात मुलांसाठी ‘किड्स रूम’ही असते. परंतु खास देवघराची खोली आता कोणत्याच घरात पाहायला मिळत नाही. मात्र तरीही प्रत्येक घरात देवघर असतेच. नित्यनेमाने देवांची पूजाही होते.
कोणाच्या देवघरात गंगोत्रीहून आणलेली गंगा असते, कुणाकडे ओंकारेश्वरचा शाळीग्राम असतो. कुणाच्या देवांमध्ये आजेसासूंना लग्नात मिळालेली अन्नपूर्णेची सुमारे शतकभरापूर्वीची मूर्ती असते तर कुणाकडे सोन्याचा बाळकृष्ण असतो. या देवघराचे कौतुक सहसा नातेवाईक सोडून इतरांना सांगितले जात नाही. परंतु आता ‘लोकसत्ता’ अशा काही खास देवघरांचे जाहीर कौतुक करणार आहे.
‘लोकसत्ता’तर्फे ‘माझं देवघर’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी ५ बाय ७ आकाराची तीन रंगीत छायाचित्रे ‘लोकसत्ता’ कार्यालयात रविवार, ७ सप्टेंबपर्यंत पाठवायची आहेत. सोबत देवघराचे महत्त्व तसेच ते आपल्याला खास का वाटते याविषयीचे एक टिपणही द्यायचे आहे. ही स्पर्धा फक्त मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई विभागांसाठी मर्यादित आहे.
प्रवेशिका ‘लोकसत्ता ब्रँड टीम, एक्स्प्रेस टॉवर्स, दुसरा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई-२१’ या पत्त्यावर पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी दूरध्वनी : ६७४४०३४७/ ६७४४०३६९

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 6:29 am

Web Title: maze deoghar competition form loksatta
Next Stories
1 गणेशोत्सवात चायनीज दरवळ
2 ओंकार गव्हांकुराचा!
3 आली गौराई अंगणी..!
Just Now!
X