एमबीए या दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य शासनाचे तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र स्तरावर सामाईक प्रवेश परीक्षा घेणार असून ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने १५ व १६ मार्चला होणार आहे.
याबाबतची संपूर्ण माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळानुसार १४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येईल व विलंब शुल्कासह १६ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी व फार्म भरता येईल.
परीक्षेला पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना ४ मार्चपासून प्रवेश पत्र देण्यात येणार आहे. या परीक्षेचा निकाल २१ एप्रिलला सांयकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. याकरिता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००० रुपये, तर राखीव प्रवर्गातील व अपंग विद्यार्थ्यांकरिता ८०० रुपये प्रवेश परीक्षा शुल्क आकारण्यात येतील. इतर माहितीकरिता पडोली येथील इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅड रिसर्च महाविद्यालयाशी संपर्क करावा.