वाढत्या मजुरीमुळे शेती करणे आज कठीण झाले आहे. कमी मनुष्यबळ आणि पाण्याचाही कमी वापर करून अधिक कृषी उत्पादन घेण्यासाठी यांत्रिक शेती हाच उत्तम पर्याय असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले.
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या (सीआयसीआर) परिसरात आयोजित करण्यात आलेल्या  राष्ट्रीय ‘कृषी वसंत’ या प्रदर्शनात सोमवारी सकाळच्या पहिल्या सत्रात ‘शेतीचे यांत्रिकीकरण’ या विषयावर चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात डॉ. पी. एस. तिवारी, डॉ. केशव मूर्ती, डॉ. बालचंद्र बाबू या तज्ज्ञांनी विचार मांडले. या चर्चासत्राच्या सुरुवातीलाच तज्ज्ञांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. विषयाला धरून आणि विषयाबाहेरचे प्रश्न शेतक ऱ्यांनी विचारले.
जमिनीवरील ७० टक्के पाण्याचा वापर शेतीसाठी केला जात आहे. एक किलो तांदूळ उत्पादन करण्यासाठी ४ हजार लिटर पाणी लागते. पाण्याचा कमी वापर करून तसेच कमी मनुष्यबळात अधिक उत्पादन घेण्यासाठी आज यांत्रिकी पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्र कमी होत चालले आहे. छोटय़ा शेतकऱ्यांसाठीही काही यंत्रे आहेत का? असा प्रश्न खंडवा येथील शेतकऱ्याने उपस्थित केला. जमिनीने परीक्षण करून कोणती यंत्रे वापरावी, किती एकर जमिनीसाठी किती अश्वशक्तीच्या यंत्राची गरज आहे, हे निश्चित केले जाईल, असे डॉ. तिवारी म्हणाले. शेतातील मोठे दगड गोळा करण्यासाठी अद्याप यंत्र निघाले नाही, पण छोटे दगड काढण्यासाठी यंत्र आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी छोटी यंत्रे देण्याची योजना कृषी विभाग तयार करीत आहे. डोंगराळ भागातील शेतक ऱ्यांकडून छोटय़ा यंत्रांची मागणी अधिक आहे. यासाठी छोटी यंत्रे उपलब्ध करून दिले जातील, असे डॉ. तिवारी म्हणाले.
उत्पादन वाढविणे हाच शेतीच्या यांत्रिकीकरणाचा मुख्य उद्देश आहे. यंत्राच्या वापरामुळे देशात धान उत्पादन वाढणार आहे. शेतात कामे करण्यासाठी मजूर मिळत नाही, म्हणून यंत्रांचा वापर करणे आज आवश्यक झाले आहे. अनेक मजुरांचे काम एक यंत्र करीत असल्याने मजुरीवर होणारा खर्चही वाचवता येतो. धान रोवणीसाठीही यंत्राचा वापर होऊ लागला आहे. ओडिशामध्ये शेतकऱ्यांचे ५०० समूह २५ हजार एकरात यांत्रिक पद्धतीने कामे करीत आहेत, असे डॉ. केशव मूर्ती म्हणाले. त्यांनी पॅडी ट्रान्सप्लेंटरबाबत सादरीकरण करून त्याच्या वापराबाबत माहिती दिली. विविध कामांसाठी शेतात यंत्रांचा वापर कसा होतो, याबाबत बालचंद्र बाबू यांनी माहिती दिली. रोटोव्हेटरपासून ट्रॅक्टपर्यंत उपयोगात येत असलेल्या यंत्रांची माहिती त्यांनी शेतक ऱ्यांना दिली.
पाच शेतक ऱ्यांचा गौरव
चर्चासत्रात तज्ज्ञांनी शेतक ऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतीचे यांत्रिकीकरण या विषयावर उत्कृष्ट प्रश्न विचारणाऱ्या पाच शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्य़ातील बल्लारपूर येथील सदानंद बावणे, झांशी येथील संभू दीक्षित, खंडवाचे लक्ष्मीनारायण, आंध्रमधील गडप्पाचे बी.बी. रमण व पुष्पेंद्र पटेल यांचा समावेश आहे.

mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
wheat India wheat production estimated at 1120 lakh tonnes this year
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?