भारतीय वैद्यक परिषदेने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व शासकीय महाविद्यालयातील वेबसाईट अपडेट केली जाणार आहे. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) वेबसाईटचा समावेश आहे. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या नवीन दिशा निर्देशानुसार परिषदेने हे निर्देश दिले आहेत.
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या नवीन निर्देशानुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना आपल्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती साठवणे आवश्यक आहे. त्यामध्ये रुग्णालयातील वार्डाची संख्या, खाटांची संख्या, भरती असलेल्या रुग्णांची संख्या व अन्य माहितीचा समावेश राहणार आहे. याशिवाय माहिती अधिकार कायद्यानुसार महाविद्यालयातील शिक्षक आणि तेथे असलेल्या यंत्रसामुग्रीची माहितीही टाकणे अनिवार्य करण्यात आली आहे. भारतीय वैद्यक परिषदेने राज्यातील सर्व १४ महाविद्यालयांना हे आदेश दिले आहेत. परिषदेसोबतच राज्य सरकारनेही हे आदेश दिले आहेत.
मेडिकलमध्ये एप्रिल २०१० मध्ये वेबसाईट सुरू करण्यात आली होती.