जिल्ह्यातील औषध दुकाने बुधवारपासून (दि. २६) सकाळी बंद राहणार आहेत. दुपारी २ ते रात्री १० या वेळेत रुग्णांना सेवा देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईच्या जाचाला कंटाळून विक्रेते आपले परवाने १५ जुलैला सरकारला परत करणार आहेत. याचाच भाग म्हणून हे आंदोलन आहे. परभणी शहरात दुपारी २ ते रात्री १० व ग्रामीण भागात दुपारी १ ते रात्री ९ या वेळेत औषधी दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत. सोमवारपासून राज्यात हे आंदोलन सुरू झाले.