04 July 2020

News Flash

शिक्षणाच्या कंपनीकरण विरोधात आज नाशिकमध्ये बैठक

मुंबईपाठोपाठ पुणे व इतर महापालिकांच्या शाळांचे खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्या विरोधात जिल्हा स्तरावर शिक्षणाच्या कंपनीकरणाविरोधात अभियान समिती स्थापन करण्यासाठी पालक, शिक्षक व शिक्षण

| March 6, 2013 01:12 am

मुंबईपाठोपाठ पुणे व इतर महापालिकांच्या शाळांचे खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्या विरोधात जिल्हा स्तरावर शिक्षणाच्या कंपनीकरणाविरोधात अभियान समिती स्थापन करण्यासाठी पालक, शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही बैठक बुधवारी येथील हुतात्मा स्मारकात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.
मुंबई पालिकेच्या शाळा खासगी संस्थांकडे देण्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे. याविरोधात मुंबई शिक्षण कंपनीकरणविरोधी अभियान महाराष्ट्र स्तरावर सुरु करण्यात आले आहे. अनेक संघटनांचा सहभाग असलेल्या या अभियानाव्दारे मनपा शाळांच्या खासगीकरणास विरोध करण्यात येत असून, मुख्यमंत्र्यांनी या निर्णयास विरोध करावा म्हणून महाराष्ट्रात निदर्शने करण्यात येणार आहेत. मुंबईपाठोपाठ पुणे व इतर मनपा शाळांच्या खासगीकरणाला गती मिळणार आहे. खासगीकरणाच्या या प्रक्रियेमुळे शिक्षणाचा दर्जा तर सुधारणार नाहीच, उलट ते अधिक महाग होईल. खासगी संस्थांचा शिक्षणापेक्षाही शाळांच्या जमिनीवर डोळा असून, या निर्णयामुळे शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या नियमित नोक ऱ्याही संकटात येतील. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षणक्षेत्रातील    कार्यकर्त्यांनी   या विरोधात एकत्र    येण्याची गरज येथील   शिक्षण    बाजारीकरणविरोधी   मंचने व्यक्त केली आहे.
यासंदर्भात विचार करण्यासाठी आणि मुंबई शिक्षण कंपनीकरणविरोधी अभियानची एक समिती नाशिक जिल्हा स्तरावर स्थापण्यासाठी ही बैठक होणार आहे. या बैठकीस सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, भारत ज्ञान विज्ञान समिती, घरेलू कामगार संघटना व समाजवादी अध्यापन सभा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2013 1:12 am

Web Title: meeting in nashik on opposed to education privatization
टॅग Nashik
Next Stories
1 महिला दिनी आशा सेविकांचा गौरव
2 अंनिसची ‘कायदा मागणी निर्धार मोहीम’
3 विविध कार्यक्रमांमधून जागविला मराठी भाषेचा अभिमान
Just Now!
X