स्पंदन कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे गतिमंदांच्या आंतरशालेय भेटकार्ड स्पर्धा व प्रदर्शन आयोजित करण्यात आले. ५३ विद्यार्थ्यांनी तयार केलेली आकर्षक भेटकार्डे पाहून उपस्थित थक्क झाले.
स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क खात्याचे विभागीय संचालक मोहन वर्दे यांच्या हस्ते झाले. मानसिक विकलांग मुलांच्या प्रभावी सामाजिक पुनर्वसनासाठी त्यांना योग्य व्यावसायिक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यांच्या सर्वागीण पुनर्वसनासाठी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही महत्त्वाची जबाबदारी ठरते, असे याप्रसंगी वर्दे म्हणाले.
या आंतरशालेय भेटकार्ड स्पर्धेत दहा शाळांमधील ५३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी रेखाटलेल्या कार्डाचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. ही आकर्षक भेट कार्डे पाहून उपस्थित थक्क झाले. विशेष विद्यार्थ्यांनी तयार केलेली भेट कार्डे त्यांनी खरेदी करून मदतीचा हात दिला.
कामठी पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, कवी लोकनाथ यशवंत, हिंगणाचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष खडसे, विदर्भ ट्रेड अँड इंडस्ट्रिजचे उपाध्यक्ष श्रीनिवास वरंभे, भाजप महिला आघाडीच्या महासचिव वैशाली सोनुने, नीळकंठ भानुसे, बिहारी शिवहरे, प्रवीण देशपांडे, रघुनंदिनी रंजन, सीताराम राऊतसंजय खरात, सुधाकर वाळके, प्रीती दहिकर, अरुणा पांडे, मेघा वानखेडे, नत्थूजी ठाकरे, एस. एस. रंजन, भाग्यश्री तुपकर, सुरेश भांडारकर, लक्ष्मण शुक्ला, राजेष हेडाऊ, जयंत अणेराव, भोजराज वाकडे, निलेश कोठारी, राजेश समुंद्रे, नितेश मोरे, सुधा राणा, वनीता ढगे आदींसह अनेक पालक व नागरिक याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक शरद राठी यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.