03 December 2020

News Flash

.. तर मतिमंद, गतिमंद मुलेही आत्मनिर्भर

मतिमंद, गतिमंद तसेच स्वमग्न मुलांवर ‘ऑटोलोगस बोन मॅरो स्टेम सेल’ उपचारपद्धती केल्यास अशी मुले आत्मनिर्भर होत स्वत:ची कामे स्वत करू शकतात, तसेच दैनंदिन व्यवहारात उत्तम

| January 10, 2015 07:50 am

मतिमंद, गतिमंद तसेच स्वमग्न मुलांवर ‘ऑटोलोगस बोन मॅरो स्टेम सेल’ उपचारपद्धती केल्यास अशी मुले आत्मनिर्भर होत स्वत:ची कामे स्वत करू शकतात, तसेच दैनंदिन व्यवहारात उत्तम संवाद साधू शकतात, असा दावा न्यूरोजन ब्रेन स्पाइन इन्स्टिटय़ूटच्या उपसंचालक न्यूरोसर्जन डॉ. नंदिनी गोकुलचंद्रन यांनी केला आहे. या वेळी स्टेम सेल उपचारपद्धतीचा उपचार घेणाऱ्या नाशिकच्या तीन विद्यार्थ्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
पत्रकार परिषदेत डॉ. नंदिनी यांनी स्टेम सेल थेरपीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. स्टेम सेलमुळे (स्कंधकोशिका उपचार) रुग्णांमध्ये कमालीचे बदल दिसत असून उपचारानंतर रुग्णाच्या मेंदूच्या करण्यात आलेल्या पेट सीटी स्कॅनमध्येही मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विविध न्यूरोलॉजिकल समस्यांमध्ये स्टेमसेल थेरपीनंतर भौतिकोपचाराने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. भारतात २५० मुलांपैकी एका मुलामध्ये ‘ऑटिझम’ आढळतो. मेंदूच्या कार्यक्षमतेत मोठय़ा प्रमाणावर विकलांगता आणणाऱ्या ऑटिझममुळे मुले अतिचंचल आणि आक्रमक होतात. ज्याचा परिणाम त्यांचा समाजाशी होणाऱ्या संवादावर होतो. वाचा, भाषा आणि संवाद साधणे यावर ‘ऑटिझम’मध्ये मोठय़ा प्रमाणावर परिणाम होतो. ही मुले सामान्य शाळेत जाऊ शकत नाही तसेच दैनंदिन कामासाठी त्यांना पालकांवर विसंबून राहावे लागते. या विकाराची लक्षणे वयाच्या तिसऱ्या वर्षांआधी दिसू लागतात. आजाराची कारणे अद्याप अज्ञात असली तरी आनुवंशिक, चयापचय किंवा
मज्जासंस्थेशी संबंधित बाबी काही संसर्ग, जन्माआधी किं वा जन्मानंतरचे वातावरण या विकाराशी याचा संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.
‘ऑटिझम’वर नियंत्रण येण्यासाठी दीर्घमुदतीच्या व्यवस्थापनाची गरज आहे. सध्या स्वभाव, आहार, संवेदना आणि काही लक्षणात्मक उपचार उपलब्ध आहेत. मात्र ऑटिझमवर उपचारासाठी स्टेम सेलच्या माध्यमातून सुधारणा घडण्यात प्रामुख्याने बदल होत आहे. यामध्ये चेता संस्थेतील पेशींना रेण्वीय, रचनात्मक आणि कार्यक्षम पातळ्यांवर दुरुस्त करण्यात येते. न्यूरोप्रोटेक्शन, न्यूरोमॉडय़ुलेशन आणि न्यूरोरिस्टोरेशनवर हायप्रोपरफ्युशन आणि इम्युन डिसरेग्युलेशनच्या माध्यमातून या समस्येवर तोडगा काढता येतो.
सध्या नाशिकमध्ये हेरंब वागळे, वृष्टी ठक्कर आणि पुरू प्रल्हाद उपचार घेत आहेत. स्टेमसेलमुळे त्यांचा भावनिक तसेच बुद्धय़ांक वाढण्यास मदत झाली असून त्यांची क्रियाशीलता वाढली असल्याचा दावा डॉ. नंदिनी यांनी केला. या वेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 7:50 am

Web Title: mentally challenged childrens become self dependable
टॅग Nashik
Next Stories
1 शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका..
2 शेतकऱ्यांना एकरी साडे दहा लाख रुपये
3 नाशिक पालिकेसमोर कामगारांचा घंटानाद
Just Now!
X