News Flash

सालेकसा तालुक्याच्या आश्रमशाळेतील बेपत्ता विद्यार्थी पुण्यातील रिमांड होममध्ये

सालेकसा तालुक्यातील इठाई आश्रमशाळेचा विद्यार्थी अक्षय कैलास परसगाये (११) हा शाळेतून २३ जानेवारी २०१२ रोजी बाजारात मावशीला भेटायला जातो म्हणून निघून गेला व बेपत्ता झाला.

| April 3, 2013 02:54 am

सालेकसा तालुक्यातील इठाई आश्रमशाळेचा विद्यार्थी अक्षय कैलास परसगाये (११) हा शाळेतून २३ जानेवारी २०१२ रोजी बाजारात मावशीला भेटायला जातो म्हणून निघून गेला व बेपत्ता झाला. अखेर तो पुण्याच्या रिमांड होममध्ये सापडला. पुण्यातील पोलिसांना खोटे नाव सांगितल्यामुळे त्याला शोधण्यासाठी इतके दिवस लागले.
मुख्याध्यापक मोरे यांनी पोलीस ठाण्यात २ फेबुवारी २०१२ ला अक्षय बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. त्यानंतर पोलिसांनी सर्वत्र शोधाशोध केली, पण पत्ता लागला नाही. मुलगा रेल्वेने पुणे येथे गेला. त्याला रेल्वे प्लॅटफार्मवर पोलिसांनी पकडले. नाव विचारले असता नाव बदलून ओमप्रकाश मोहारे असे सांगितले. गावाचे नाव मुंडीपार सांगितले, पण तालुक्याचे नाव सांगितले नाही तेव्हा पोलिसांनी त्याला पुण्याच्या रिमांड होममध्ये नेले व तेथे त्याच्या राहण्याची व्यवस्था केली. अक्षयला नेहमीच विचारपूर केली जात होती, पण तो बरोबर माहिती देत नव्हता. अशातच २६ मार्च २०१२ ला गोंदियाच्या बालकल्याण समितीत दूरध्वनी आला. मौजा मुंडीपार येथील एक मुलगा पुण्याच्या बाल सुधारगृहात आहे, असे सांगितले गेले. हे कळताच इठाई आश्रमशाळेचे छेबेसकुमार टेंभरे व नामदेव मोरे, पोलीस हवालदार इन्साराम देव्हारी, शिपाई रामकिसन मेहर, सुनील चव्हाण, खुशाल बर्वे, मुलाचे वडील कैलास परसगाये पुण्यास गेले. ओळख पटल्यावर तेथून अक्षयला ३० मार्चला पोलिसांनी ठाण्यात आणले. तेथे पोलिसांनी सर्वाचे बयाण घेतले. मुलाला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. हा संपूर्ण तपास हा सालेकसा ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चमूने केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 2:54 am

Web Title: missing student from salekasa distrect hermitage school found in pune remand home
Next Stories
1 उमरखेडच्या ६ मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार
2 प्राध्यापकांच्या संपाविरुद्ध विद्यार्थी संघटनांचा ‘एल्गार’
3 धन्वंतरी प्रकल्पाचे १२ एप्रिलला उद्घाटन
Just Now!
X