News Flash

आ. मनीष जैन यांचा २० एप्रिल रोजी काँग्रेस प्रवेश

जामनेर पालिकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर अपक्ष आमदार मनीष जैन यांच्या काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. २० एप्रिल रोजी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या

| April 3, 2013 02:16 am

जामनेर पालिकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर अपक्ष आमदार मनीष जैन यांच्या काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. २० एप्रिल रोजी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कापूस परिषदेत हा प्रवेश सोहळा होणार आहे.
आ. मनीष जैन हे राष्ट्रवादीचे खा. ईश्वरलाल जैन यांचे पुत्र असुन त्यांनीच काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात २० एप्रिल रोजी कापूस परिषदेचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मंत्री या परिषदेस उपस्थित राहणार आहेत. जामनेर पालिका निवडणुकीत खा. ईश्वरलाल जैन यांच्या नेतृत्वातील काँग्रेस आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर मनीष जैन यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल अधिकृत वक्तव्य करण्यात येऊ लागले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाब देवकर यांच्याशी जिल्हा बँक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून झालेला दुरावा, एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसशी झालेले मतभेद हे संशयाचे प्रमुख कारण होते. तरीही पालक मंत्र्यांसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सर्व गटातटांना एकत्र आणण्याची करामत जैन यांनी करून दाखविल्याचे पालिका निवडणुकीने स्पष्ट झाले आहे. जैन राष्ट्रवादीचे खासदार असले तरी जामनेरात १० जागा काँग्रेसला व चार राष्ट्रवादीला मिळाल्या. काँग्रेसचा हा प्रचंड विजय आ. मनीष जैन यांची काँग्रेसला भेट असल्याचे म्हटले गेले आहे. या विजयामुळेच जैन यांचा २० एप्रिल रोजी काँग्रेस प्रवेश निश्चित झाल्याचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 2:16 am

Web Title: mla manish jain comeing in to congress on 20th april
टॅग : Congress
Next Stories
1 नाशिक क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यान्वित करण्याची गरज
2 जिल्हा विकासास अडथळा ठरणाऱ्या कार्यपद्धतीचा अहवाल मांडणार
3 प्रतीक गाडेकर ‘साई फिटनेस श्री’चा मानकरी
Just Now!
X