01 June 2020

News Flash

मनसेच्या नेतृत्वाखाली शेतकरी, शेतमजुरांचा मोर्चा

शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे आणि एकलव्य आदिवासी संघटना यांच्या वतीने बुधवारी येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

| August 28, 2014 06:55 am

शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे आणि एकलव्य आदिवासी संघटना यांच्या वतीने बुधवारी येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळाली नाही. सदोष पंचनाम्यामुळे बहुसंख्य गरजू भरपाईपासून वंचित राहिले. प्रशासकीय पातळीवर त्या संदर्भात कोणतीच कारवाई होत नसल्याची तक्रार करीत वंचित सर्व नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली. शेतमालाला हमी भाव द्यावा, शासकीय व वनखात्याच्या जमिनीत वर्षांनुवर्षे शेती कसणाऱ्या गरिबांना सात-बारा उतारा द्यावा, अन्नसुरक्षा योजनेचा गरिबांना लाभ द्यावा, निराधार वृद्धांना निवृत्तिवेतन द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चात नगरसेवक गुलाब पगारे, श्रीराम सोनवणे, नकुल निकम आदी सामील झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2014 6:55 am

Web Title: mns farmers march
टॅग Mns
Next Stories
1 वृक्ष संवर्धनासाठी लोकसहभाग महत्त्वपूर्ण
2 दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत पेठ व चांदवड
3 सिन्नर बस स्थानकातील वायफाय सुविधेची नवीन डोकेदुखी
Just Now!
X