29 September 2020

News Flash

मनसेचा खारघर टोलनाक्याला विरोध

सायन-पनवेल महामार्गावरील खारघर येथील टोलनाक्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बेकायदा टोल ठरवून उशिरा का होईना आपला विरोध दर्शविला आहे.

| November 1, 2014 01:07 am

सायन-पनवेल महामार्गावरील खारघर येथील टोलनाक्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बेकायदा टोल ठरवून उशिरा का होईना आपला विरोध दर्शविला आहे. मनसेच्या जिल्हाध्यक्ष अतुल भगत व पदाधिकाऱ्यांनी सायन-पनवेल महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कडेकोट बंदोबस्तामध्ये कळंबोली मॅक्डोनाल्डमध्ये दिले. मनसे खारघर टोलविरोधी असल्याचे समजताच निवेदनाच्या नावावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चार पोलीस ठाण्यांचे बळ महामार्गालगत उभे केले होते.
महामार्गावरील टोलवसुलीबाबत केंद्र सरकारच्या नियमांवर बोट ठेवून खारघर येथे उभारलेला टोल बेकायदा असल्याचे जिल्हाध्यक्ष भगत यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. खारघर येथे नोव्हेंबर महिन्यात टोलवसुली सुरू होणार असल्याच्या अफवेमुळे मनसेने हे निवेदन देण्याचे आंदोलन हाती घेतले. शेकाप, आरपीआय, शिवसेना, भाजप या राजकीय पक्षांनी टोलला विरोध केलेला नाही. मात्र टोलची जागा आणि स्थानिकांना टोलमधून सूट यासाठी या राजकीय पक्षांनी याअगोदरच खारघर टोल हा मुख्य मुद्दा बनविला आहे. गुरुवारी मनसे आंदोलन करणार असे समजल्यामुळे पोलिसांनी तालुक्यातील मुख्य पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधक कारवाईच्या नोटिसा बजावल्याने मनसेसैनिक आंदोलनापूर्वीच गारद झाले. मनसेच्या वतीने महामार्ग प्राधिकरणाला निवेदन देण्याचा कार्यक्रमही त्यासाठी पोलिसांनी कळंबोलीच्या मॅक्डोनाल्ड हॉटेलच्या बाहेर करून घेतला. त्यावेळी मनसेचे ३० कार्यकर्ते आणि शंभर पोलीस उपस्थित होते.
सतर्क पोलीस
पोलिसांनी महामार्गावरील कळंबोली येथील मॅक्डोनाल्ड हॉटेल परिसरात बंदोबस्त लावल्याने दुपारी काही तासांसाठी मॅक बंद करण्यात आले होते. तेथे पोलीस छावणीचे रूप होते. तैनात पोलिसांची नजर तेथे उभ्या असणाऱ्या मारुती स्विफ्टमोटारीवर गेली. पोलीसमित्र असे ओळखपत्र त्या मोटारीमध्ये लावले होते. तसेच एका मोटारीमध्ये पोलीस नव्हते. मात्र पोलीस अधिकाऱ्याची टोपी होती. पोलिसांनी या दोन्ही मोटारींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या मते प्राणिमित्र असतात, पोलीसमित्र अशी कोणतीही अधिकृत संघटना पोलिसांची नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2014 1:07 am

Web Title: mns opposed kharghar toll booth
टॅग Mns
Next Stories
1 उरण एसटी आगार समस्यांनी ग्रासले
2 जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना लवकरच साडेबारा टक्केचे इरादा पत्र मिळणार
3 पनवेलकरांची स्वच्छतेसाठी एक धाव
Just Now!
X