महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राजूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. घरकुल योजना, वस्तीग्रह, शेती अवजारे, आश्रमशाळा, एजंटाचा बंदोबस्त करावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
मोर्चासमोर बोलतांना पक्षाचे राजूर विभागप्रमुख डॉ. किरण लहामटे म्हणाले, आदिवासी विकास कार्यालय हे आदिवासी जनतेच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी आहे, ते कोणत्या पक्षाचे नाही.  मात्र त्याला तसेच रूप आले आहे. त्यामुळेच दलालंचा गराडा या कार्यलयाला पडला आहे. विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांंच कामाचे ठेके दिले जातात.
प्रकल्प कार्यालयातून शेती अवजारे दिली जातात, त्यासह वस्तीगृहांच्या मुलांना निकृष्ट जेवण,परीक्षा एक दिवसावर आली तरी पुस्तकांचा पत्ता नाही, स्वच्छतागृह साफ नाहीत अशा अनेक तक्रारी त्यांनी केल्या. त्यावर येत्या पंधरा दिवसात कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन करावे लागेल असा ईशाराही त्यांनी दिला. संजय वाकचौरे यांनीही यावेळी  टीका केली. कार्यालयीन अधिक्षक एस. टी. बागूल यांना यावेळी निवेदन देण्यात आले.