मनसे विद्यार्थी आघाडीने केलेल्या आंदोलनानंतर अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागीय मंडळाच्या वतीने उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या प्रवेशपत्रांमधील बैठक क्रमांकांमध्ये चूक झाल्याचे मान्य करीत विद्यार्थ्यांना दुरूस्ती करून प्रवेशपत्र देण्याची सूचना प्राचार्याना केली आहे.
फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये होणाऱ्या १२ वी परीक्षेसाठी आवेदनपत्र प्रथमच ऑनलाइन पद्धतीने स्वीकारल्यामुळे पुढील सर्व कामे ( उदा. यादी तयार करणे, प्रवेशपत्र तयार करणे आदी ) संगणकाव्दारे करण्यात आली. त्यामुळे काही प्रवेशपत्रांमध्ये त्रुटी राहिल्या आहेत. हा प्रकार मनसे विद्यार्थी आघाडीच्या लक्षात आल्यावर त्यांनी मंडळाचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांच्या कक्षात विद्यार्थी आघाडीच्या अजिंक्य गिते यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या दिला. त्रुटी झाल्याचे मान्य करीत जगताप यांनी यासंदर्भात दुरूस्तीसाठी प्राचार्याना कळविण्यात आल्याची माहिती आंदोलकांना दिली. त्याच दरम्यान शहरातील केटीएचएम महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने आपणांस अशा दुरूस्तीसंदर्भात महाविद्यालयाकडून अद्याप कोणतीच माहिती देण्यात आली नसल्याचा आक्षेप घेतला.
अखेर जगताप यांनी सर्व शाळांच्या प्राचार्याना दुरूस्ती करण्यासाठी पत्रक काढले. त्यात प्रवेशपत्रावरील सर्व प्रकारच्या नोंदी (उदा. विद्यार्थ्यांचे नाव, विषय, केंद्र, बैठक क्रमांक अंकी व अक्षरी, छायाचित्र, स्वाक्षरी) काळजीपूर्वक तपासण्याची सूचना करण्यात आली आहे. प्रवेशपत्रात सर्व विद्यार्थ्यांचा अंकी बैठक क्रमांक योग्य असून अक्षरी बैठक क्रमांकाची नोंद अपूर्ण आहे.
उदाहरणार्थ एस-१०४२६३ हा बैठक क्रमांक इंग्रजीत अक्षरी र – डठए छअङऌोडवफ ळऌडवरअठऊ ळहड ऌवठऊफएऊ रकळ ळऌफएए असणे आवश्यक होते. तथापि, तांत्रिक अडचणीमुळे र – डठए छअङऌोडवफ ळऌडवरअठऊ ळहड ऌवठऊफएऊ रकळ एवढेच आले आहे. त्यामुळे प्राचार्यानी सर्व प्रवेशपत्रांची कार्यालयीन अभिलेखावरून पडताळणी करून त्यात आवश्यक दुरूस्ती केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रांचे तातडीने वितरण करावे. प्रवेशपत्रातील दुरूस्तीसाठी कोणत्याही विद्यार्थ्यांस मंडळाच्या कार्यालयात पाठवू नये
असेही या पत्रकात बजावण्यात आले आहे.