22 September 2020

News Flash

नांदगावमधून निवडणूक लढविण्यासाठी कार्यकर्ते राज यांना विनंती करणार

विधानसभा निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: निवडणूक लढवून नेतृत्व करण्याची स्वीकारलेली भूमिका स्वागतार्ह असून राज यांनी नांदगाव तालुक्यातून निवडणूक लढवावी अशी विनंती तालुक्यातील

| June 4, 2014 08:00 am

विधानसभा निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: निवडणूक लढवून नेतृत्व करण्याची स्वीकारलेली भूमिका स्वागतार्ह असून राज यांनी नांदगाव तालुक्यातून निवडणूक लढवावी अशी विनंती तालुक्यातील मनसे कार्यकर्ते करणार आहेत. पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत याबाबत एकमत झाले असून लवकरच कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ मुंबईत राज यांची भेट घेणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हा संघटक राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तालुक्यात मनमाड शहरातील पाणीप्रश्न हा जिव्हाळ्याचा असून राज ठाकरे यांनी विधानसभेत तालुक्याचे प्रतिनिधीत्व केल्यास हा प्रश्न सहज सुटू शकेल. त्यांना नांदगाव तालुक्यातून निवडून आणण्याची जबाबदारी कार्यकर्ते स्वीकारतील असेही पवार यांनी सांगितले.
नांदगाव मतदारसंघातून यापूर्वी शिवसेना-भाजप युतीचे तसेच सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार असूनही पाणीप्रश्न सुटलेला नाही. मनमाडसाठी पाणी योजनेचा अभ्यास त्यांनी केला नाही. या पाश्र्वभूमीवर राज ठाकरे यांची उमेदवारी विकासाला चालना देणारी ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मनसे शहरप्रमुख सुनील हांडगे, राजाभाऊ पवार यांनी विस्तृत विवेचन केले. कांतीलाल चौबे, अप्पा आंधळे, प्रकाश लोढा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2014 8:00 am

Web Title: mns workers pledge raj thackeray to contest election from nagaon
टॅग Raj Thackeray
Next Stories
1 शाळांबाहेर प्रवेश शुल्काचे फलक लावण्याची अधिकाऱ्यांची ग्वाही
2 बारावी परीक्षेत नाशिक विभागात धुळे अव्वल
3 ग्रामरोजगार सेवक व मनरेगा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
Just Now!
X