News Flash

कर्जाची परतफेड करूनही वसुलीसाठी त्रास देणारा सावकार अटकेत

खासगी प्रवासी वाहतुकीच्या व्यवसायासा़ठी घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड करूनदेखील आणखी तीन लाखांची रक्कम वसुलीसाठी सारखा तगादा लावत त्रास देणाऱ्या खासगी सावकाराला सोलापूर शहर पोलिसांनी सापळा

| April 3, 2013 01:24 am

खासगी प्रवासी वाहतुकीच्या व्यवसायासा़ठी घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड करूनदेखील आणखी तीन लाखांची रक्कम वसुलीसाठी सारखा तगादा लावत त्रास देणाऱ्या खासगी सावकाराला सोलापूर शहर पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्याच्याविरूध्द सावकारी प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.
अर्जुन अनंत सामल (रा. न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी मुर्तुज कासीमसाहेब शेख (रा. पडगाजी नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांनी  पोलीस आयुक्तालयातील सावकारी विरोधी पथकाकडे तक्रार नोंदविली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
मुर्तुज शेख व त्यांचे जावई नबीलाल महिबूब शेख यांनी एप्रिल-१२ मध्ये खासगी सावकार अर्जुन सामल याच्याकडून खासगी प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करण्यासाठी जुनी वाहने खरेदी करण्याकरिता तीन लाख ७० हजारांचे कर्ज घेतले होते. पाच टक्के व्याज दराने हे कर्ज देताना सामल याने शेख यांच्याकडून त्यांच्या मालकीच्या घराचे साठेखत नोटरीमार्फत नोंदवून घेतले होते. तसेच सहा कोरे धनादेशही घेतले होते. घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड करूनदेखील आणखी तीन लाखांची रक्कम येणे असल्याचे सांगत सामल याने शेख यांना त्रास दिला. त्यामुळे त्यांना पोलिसात धाव घ्यावी लागली. पोलीस आयुक्तालयातील सावकारी विरोधी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक डी. एच. पाटील व सहकार विभागातील अधिकारी आर.आर.ठोंबरे यांनी शिवछत्रपती रंगभवन परिसरात सामल यास सापळा रचून पकडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 1:24 am

Web Title: moneylander arrested giving troble for collection
टॅग : Arrested
Next Stories
1 कोल्हापुरात अतिक्रमणांवर हातोडा
2 दुष्काळावर कायमस्वरूपी उपायाचा ‘लोकमंगल’ बंधारा…
3 मनपाची पुन्हा अतिक्रमण विरोधी मोहीम
Just Now!
X