लातूर शहरासह जिल्ह्य़ात पेरूची आवक कमी होत असल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. मात्र, पेरूला अधिक मागणी असल्याचे चित्र सध्या आहे.
पेरू फळ हिवाळ्याच्या दिवसांत येते. या वर्षी फळलागण कमी झाल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला. उत्पादन घटल्याने लातूर बाजारपेठेत पेरूची आवक मंदावली. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला.
शहरातील मोजक्याच ठिकाणी पेरूचे स्टॉल दिसून येत आहेत. या स्टॉलवर पेरू खरेदीसाठी ग्राहक मोठय़ा संख्येने गर्दी करताना दिसून येत आहेत.
पांढरा पेरू प्रतिकिलो ५० ते ६० रुपये, तर लाल गर असलेला पेरू ६० ते ७० रुपये दराने विक्री केला जात आहे, अशी माहिती अजिज बागवान यांनी दिली.