वेळेचे नियोजन, तत्त्व, व्यायाम या सर्वाचे जीवनात असलेले महत्त्व प्रसिद्ध माध्यमतज्ज्ञ संजीव लाटकर यांनी पटवून दिले. ते येथे महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती यांच्या वतीने पंचवटीतील हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी महाविद्यालयात आयोजित व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेत बोलत होते.
प्रत्येक क्षण अन् क्षण महत्त्वाचा असून, जो वेळ जाणतो त्याला जीवनाचा अर्थ समजतो. वेळ जपून वापरा, प्रत्येक गोष्ट वेळेतच करा, पुढे पाच वर्षांत आपणास काय व्हायचे आहे आणि काय करायचे आहे त्यासाठी आतापासूनच नियोजन करत ध्येय गाठा, असे आवाहन लाटकर यांनी केले. एकाग्रता बाळगून जीवनाचा आनंद लुटा, ताण-तणावमुक्त जीवन जगा, रोज व्यायाम करा, विचार सुटले तर भावना बदलतात. यामुळेच माणसे दु:खाला आमंत्रण देतात. असा सल्लाही लाटकर यांनी या वेळी दिला.