News Flash

कोल्हापुरात टोलआकारणी सुरू करण्याच्या हालचाली

वादग्रस्त ठरलेल्या कोल्हापुरातील रस्त्याची टोलआकारणी सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झालेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीवेळी टोल आकारणीची पध्दत व आयआरबीकडून घ्यावयाचा खर्च याच्या नियोजनावर हात फिरविला

| March 13, 2013 10:05 am

वादग्रस्त ठरलेल्या कोल्हापुरातील रस्त्याची टोलआकारणी सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झालेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीवेळी टोल आकारणीची पध्दत व आयआरबीकडून घ्यावयाचा खर्च याच्या नियोजनावर हात फिरविला गेला आहे. महापालिकेनेही या प्रस्तावाला अप्रत्यक्षरीत्या संमती दिली असल्याचे वृत्त आहे. कालच टोल विरोधी कृती समितीने पत्रकार परिषदेत टोल आकारणीस प्रखर विरोध दर्शविला असतांना शासकीय व महापालिका पातळीवर मात्र टोल वसुलीच्या हालचालींना गती आल्याने पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.    
कोल्हापूर शहरामध्ये आयआरबी कंपनीने सुमारे २२० कोटी रूपये खर्च करून रस्ते बनविले आहेत.रस्त्यांच्या कामांच्या दर्जावरून टोल विरोधी कृती समितीने गेल्या दोन वर्षांपासून व्यापक जनआंदोलन उभे केले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या कोल्हापूर दौऱ्यावेळी संयुक्त बैठक घेऊन टोलआकारणीबाबत अंतिम घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी महापौर जयश्री सोनवणे व आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांची भेट झाल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये टोलआकारणी कशाप्रकारे केली जाईल, याचीही चर्चा झाली आहे.    
रस्ते कामातील युटिलिटी शिफ्टींगचा खर्च तूर्तास महापालिकेने करायचा आहे. तो नंतर आयआरबी कंपनीकडून वसूल केला जाणार आहे. आयुक्त बिदरी यांनी स्थायी समितीकडे अर्थसंकल्प सादर करतांना असेच सूचक वक्तव्य केले होते. याशिवाय पतदीपांचे विद्युत बिलही थकीत असून ते टोल वसूल झाल्यानंतर महापालिकेने वसूल करून घ्यावयाचे आहे. तसेच, टोल वसुलीचा दैनंदिन खर्च आयआरबी कंपनीने महापालिकेला द्यावयाचा आहे, असेही या बैठकीत ठरले असल्याचे सांगण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2013 10:05 am

Web Title: motion starts for toll collection in kolhapur
Next Stories
1 मोबाईल विक्री दुकानातून साडेदहा लाखांचा माल चोरीस
2 राजारामपुरीत एकेरी वाहतूक; नागरिकांकडून स्वागत, व्यापाऱ्यांकडून नाराजी
3 वाई बाजारात हळदीला आठ ते पंधरा हजार भाव
Just Now!
X