News Flash

पंढरपुरातून चालकाला धाक दाखवून मोटार पळविली

भाडे ठरवून प्रवासासाठी घेतलेली इंडिका कार पंढरपुरात आल्यानंतर तिघाजणांनी कारचालकाला चाकूचा धाक दाखवून व त्याचे हातपाय बांधून त्याच्या ताब्यातून कार व इतर ऐवज बळजबरीने पळवून

| August 6, 2013 01:50 am

भाडे ठरवून प्रवासासाठी घेतलेली इंडिका कार पंढरपुरात आल्यानंतर तिघाजणांनी कारचालकाला चाकूचा धाक दाखवून व त्याचे हातपाय बांधून त्याच्या ताब्यातून कार व इतर ऐवज बळजबरीने पळवून नेल्याची घटना पंढरपुरात गोपाळपूर येथे घडली.
मदन पांडुरंग साळुंखे (वय २७, रा. सोनखेड, ता. निलंगा, जि. लातूर) असे लुटण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. तिघा तरुणांनी पंढरपूरला जाण्यासाठी म्हणून साळुंखे याच्या ताब्यातील इंडिका कार भाडय़ाने ठरविली. पंढरपुरात आल्यानंतर गोपाळपूर येथे अचानकपणे कारमध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या तिघा तरुणांनी पवित्रा बदलत चालक साळुंखे यास चाकूचा धाक दाखवत त्यास कारमधून खाली उतरविले व त्याच्या ताब्यातील रोख रक्कम तसेच मोबाइल आदी ऐवज बळजबरीने काढून घेतला. नंतर चोरटय़ांनी त्याचे हाय-पाय बांधले व तोंडाला चिकटपट्टीही लावली. त्यास रस्त्यावर टाकून देत चोरटे कार घेऊन पसार झाले. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात या गुन्हय़ाची  नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 1:50 am

Web Title: motor stolen with threaten to driver in pandharpur
टॅग : Driver,Pandharpur,Threaten
Next Stories
1 प्रशासन व पदाधिका-यांनी इगो बाजूला ठेवा- पिचड
2 नद्यांना पूर, होडी तहसील कार्यालयातच
3 सीनाकाठच्या गावांना टँकर सुरू करण्याचे आश्वासन
Just Now!
X