टेंबे स्वामी यांच्यावर चित्रपट ‘श्री योगी’
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. मराठीत यापूर्वी ‘संत ज्ञानेश्वर’, ‘संत एकनाथ’, ‘संत तुकाराम’, ‘भक्त प्रल्हाद’, ‘संत गोरा कुंभार’ संत गाडगेबाबांच्या जीवनावरील ‘देवकीनंदन गोपाला’, आदी चित्रपट आले.
आता दत्त संप्रदायातील श्री वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी यांच्या जीवनावर ‘माय माऊली निर्मिती’संस्थेतर्फे माऊली ऊर्फ उत्तम मयेकर यांनी ‘श्री योगी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत लता गायकवाड यांनी केले असून चित्रपटात टेंबे स्वामी यांची भूमिका आनंदा कारेकर यांनी केली आहे. कथा, पटकथा आणि संवाद प्रा. प्रवीण दवणे आणि चंद्रकांत लता गायकवाड यांचे आहेत. चित्रपटात रवींद्र महाजनी, अरुण नलावडे, गिरीश परदेशी, शर्वरी लोहोकरे, यतीन कार्येकर, उदय टिकेकर, अमोल बावडेकर, डॉ. विलास उजवणे यांच्या भूमिका आहेत.