देशातील लोकशाहीच्या प्रयोगाबाबत स्वतंत्र व एकत्रित विचार होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्योत्तर काळात जनतेच्या देशभक्तीचे मापदंड बघणे आवश्यक ठरले आहे, असे प्रतिपादन न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी केले. मराठवाडा लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या मुक्तांगण स्मरणिकेचे प्रकाशन न्या. जोशी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश, तसेच शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शुभेच्छा दिल्या. स्मरणिकेचे मुख्य संपादक अॅड. रामनाथ चोभे यांचा न्या. जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.