जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईत प्रथमच झालेल्या कार रॅलीत तब्बल एक हजार महिला २५० गाडय़ांसह सहभागी झाल्या. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘जे. के. टायर्स अॅण्ड इंडस्ट्री लिमिटेड’ व ‘वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ही महिला कार रॅलीचे आयोजित करण्यात आली होती. ‘अॅम्बी व्हॅली सिटी’चे सहकार्य या उपक्रमास लाभले होते.
मुंबईत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या कार रॅलीत २५० गाडय़ा घेऊन सुमारे एक हजार महिला सहभागी झाल्या होत्या.
७७ वर्षीय राजकुमारी कासलीवाल यांची उपस्थितीही लक्षवेधी होती. आंतरदेशीय विमानतळाजवळील हॉटेल सहारा स्टार येथून कार रॅलीस सुरुवात झाली आणि शहरातील काही प्रमुख मार्गावरून रॅलीचा प्रवास झाला. यात वरळी सी-फेस, पेडर रोड, चौपाटी, मरिन ड्राइव्ह, चर्चगेट येथे रॅलीची सांगता झाली.
फेडेरशन इंटरनॅशनल ऑटोमोबाइल द वल्र्ड बॉडी फॉर मोटार स्पोर्ट्स अॅण्ड मोबॅलिटीचे अध्यक्ष जेन टोड हे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कार रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. ‘एफएमएससीआय’चे अध्यक्ष डॉ. विजय मल्या, उद्योजक गौतम सिंघानिया या वेळी उपस्थित होते.
रस्ता सुरक्षेबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. यातही विशेषत: सार्वजनिक वाहने आणि सार्वजनिक ठिकाणी महिलाच्या सुरक्षिततेबाबत ही जनजागृती करण्यात येणार आहे, ‘वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशन’चे कार्यकारी अध्यक्ष नितीन डोसा यांनी सांगितले.
अभिनेत्री तन्वी आझमी, नीरजा बिर्ला, मुग्धा गोडसे, गुरमित चौधरी, रेणुका कृपालिनी, दीपा दामोदरन आणि अन्य क्षेत्रांतील मान्यवर महिला या वेळी उपस्थित होत्या.