News Flash

‘मेट्रो ३’च्या मार्गात २४६४ बांधकामांचा अडथळा

मुंबईतील ‘मेट्रो ३’ प्रकल्पाने राजकारण तापत असताना ‘मेट्रो ३’च्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन चकाला, ओशिवरा, कुर्ला, विद्याविहार आणि वडाळा येथे प्रस्तावित असल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले

| March 18, 2015 06:59 am

मुंबईतील ‘मेट्रो ३’ प्रकल्पाने राजकारण तापत असताना ‘मेट्रो ३’च्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन चकाला, ओशिवरा, कुर्ला, विद्याविहार आणि वडाळा येथे प्रस्तावित असल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे. ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ने दिलेल्या माहितीत भुयारी मेट्रोच्या मार्गात एकूण २४६४ बांधकामे येत असून त्यापैकी नया नगर, माहीम येथील २४१ बांधकामे १०० टक्के आणि अन्य ठिकाणांवरील बांधकामे पूर्णपणे आणि अंशत: तोडली जाणार आहेत.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ‘मुंबई मेट्रो ३’ प्रकल्पाबाबत आरटीआय कार्यकत्रे अनिल गलगली यांनी ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’कडे माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता. ‘एमएमआरसीएल’ने दिलेल्या माहितीनुसार कफ परेड ते आरे कॉलनी २४६४ प्रकल्पग्रस्तांची बांधकामे आडवी येत आहेत. पकी निवासी १५४४, व्यावसायिक ५७६, निवासी-व्यावसायिक ३१ तर इतर ७२ अशी संख्या आहे. सर्वाधिक फटका ‘एमआयडीसी’ परिसरास बसणार असून तेथील ६२८ बांधकामे तोडली जाणार आहेत. त्यानंतर गिरगाव ३५५, काळबादेवी २९४, बीकेसी २६४ अशी क्रमवारी आहे.
पुनर्वसन कुठे करण्यात येणार आहे या प्रश्नावर ‘मेट्रो ३’च्या प्रकल्पगस्तांचे पुनर्वसन चकाला, ओशिवरा, कुर्ला, विद्याविहार आणि वडाळा येथे प्रस्तावित असून सार्वजनिक जागेवरील अतिक्रमित झोपडीधारकांचे पुनर्वसन भक्ती पार्क, वडाळा आणि वंडरलँड, ओशिवरा येथील ‘एमएमआरडीए’च्या सदनिकांमध्ये करण्याचे प्रस्तावित आहे, असे उत्तर देण्यात आले आहे. या ठिकाणी २२५ चौरस फुटांच्या सदनिका उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त ‘मे. एचडीआयएल’ यांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. तेथील सदनिका झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत प्रकल्पगस्तांच्या पुनर्वसनासाठी प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये कुर्ला प्रीमियर (प), कुर्ला (पूर्व) येथील आणि मौजे चकाला व मूळगाव अंधेरी आदी ठिकाणी २६९ चौरस फुटांच्या सदनिका उपलब्ध आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 6:59 am

Web Title: mumbai metro third phase facing rehabilitation problems
Next Stories
1 बोरिवलीत तिवरांची कत्तल
2 स्वागत यात्रेत नव्वदीचे तरुण
3 मुंबईत पाणीकपात
Just Now!
X