News Flash

बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या पुरस्कारांचे वितरण

बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण नुकतेच करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचा यावेळी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

| January 17, 2013 12:35 pm

बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण नुकतेच करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचा यावेळी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
विष्णू सावंत, नंदकुमार शिंदे, कृष्णन (आधारवड पुरस्कार), मेधा परब, मंगेश कारंडे, लीना वैद्य (ध्येयपूर्ती पुरस्कार) तसेच स्नेहा मोरे, वैशाली पारदाळे, सुनीता चौगुले (रणरागिणी पुरस्कार) आदींचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष आमदार सुभाष देसाई यांनी यावेळी वृत्तपत्रविक्री व्यवसायात नवी पिढीही कार्यरत होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. संघाचे सरचिटणीस हरी पवार, नरहर आवटी, बाळा पवार, हेमंत मोरे, जीवन भोसले, ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर, महेश म्हात्रे, ‘लोकसत्ता’चे वितरण व्यवस्थापक मंगेश ठाकूर, सॅटरडे क्लबचे माधव भिडे, ज्येष्ठ वितरक बाजीराव दांगट तसेच दीपक शिंदे, सुनील गोरे, दीपक आनंद, डॉ. आगरवाल आदी विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी सादर करण्यात आलेल्या पथनाटय़ व मनोरंजनपर कार्यक्रमांत दिगंबर नाईक, मीरा मोडक, सुप्रिया पाठक आदींनी भाग घेतला.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 12:35 pm

Web Title: mumbai newspaper saleing assocation awards distribution programe
Next Stories
1 लोकसत्ता यशस्वी भव एक उत्तम मार्गदर्शक – नसीम खान
2 राज्य सरकारच्या कासवगतीमुळे फेरीवाला धोरण शीतपेटीत
3 कारवाईचा नुसताच देखावा!
Just Now!
X