डिसेंबर महिन्यामध्ये वाचकांना खरेदी करण्याचे एक निमित्त देण्यासाठी ‘लोकसत्ता’ने खास ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’चे आयोजन केले होते. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने खरेदीसोबतच भरघोस सवलती आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीही यानिमित्ताने खरेदीवेडय़ा मुंबईकरांना मिळाली होती.
या फेस्टिव्हलच्या अंतिम फेरीमध्ये अंधेरीच्या सुचित्रा साप्टे या आठ दिवस आणि सात रात्रीच्या सिंगापूर-थायलंड टूरच्या विजेत्या ठरल्या आहेत. दोन व्यक्तींसाठी असलेल्या या टूरचे आयोजन ‘वीणा वर्ल्ड’तर्फे करण्यात आले असून नुकत्याच पार पडलेल्या फेस्टिव्हलच्या बक्षीस वितरण समारंभामध्ये ‘वीणा वर्ल्ड’चे नील पाटील यांच्या हस्ते सुचित्रा साप्टे यांना हे पॅकेज देण्यात आले. यानिमित्ताने सामान्य लोकांनाही अशा फेस्टिव्हलच्या निमित्ताने बक्षिसे जिंकण्याची संधी दिल्याबद्दल सुचित्रा यांनी ‘लोकसत्ता’चे आभार मानले. याशिवाय इतरही स्पर्धकांनी टाटा नॅनो, गस्टो बाइक, टीव्ही अशी आकर्षक पारितोषिके या फेस्टिव्हलमध्ये जिंकली.