04 April 2020

News Flash

महापालिका कर्मचा-यांचे उद्यापासून मुंबईमध्ये धरणे

परभणीसह लातूर, चंद्रपूर महापालिकांचे बंद केलेले सहायक अनुदान पूर्ववत चालू करावे, तसेच रोजंदारी कर्मचा-यांना विनाअट सेवेत कायम करावे, या मागण्यांसाठी या तिन्ही महापालिकांचे कर्मचारी गुरुवारपासून

| February 19, 2014 02:40 am

परभणीसह लातूर, चंद्रपूर महापालिकांचे बंद केलेले सहायक अनुदान पूर्ववत चालू करावे, तसेच रोजंदारी कर्मचा-यांना विनाअट सेवेत कायम करावे, या मागण्यांसाठी या तिन्ही महापालिकांचे कर्मचारी गुरुवारपासून (दि. २०) संघटनेचे नेते के. के. आंधळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मदानावर बेमुदत धरणे व निदर्शने करणार आहेत. कर्मचारी संघटनेचे सचिव मुक्तसिद खान, उपाध्यक्ष आनंद मोरे यांनी ही माहिती दिली.
नोव्हेंबर २०११मध्ये या ३ महापालिका अस्तित्वात आल्या. त्यानंतर वर्षभरात कर्मचा-यांच्या वेतनासाठी मिळणारे सहायक अनुदान सरकारने बंद केले. सरकारकडून सहायक अनुदान मिळत नसल्याने मनपासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले. परभणी मनपा कर्मचा-यांचे वेतन सहा महिन्यांपासून थकीत आहे. सेवानिवृत्त कर्मचा-यांचे १० महिन्यांचे, तसेच रोजंदारी कर्मचा-यांचेही वेतन थकले आहे. त्यामुळे या कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. हीच स्थिती लातूर व चंद्रपूर महापालिकेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2014 2:40 am

Web Title: municipal employeess demonstration start from tomorrow in mumbai
टॅग Start
Next Stories
1 पवार काका-पुतण्याविरोधात दंड थोपटत मुंडेंचे शक्तिप्रदर्शन!
2 राष्ट्रवादीतर्फे पुन्हा पाटील, शिवसेनेचा उमेदवार ठरेना
3 ‘माढय़ा’चा तिढा सुटता सुटेना!
Just Now!
X