News Flash

विवाहितेचा खून करून प्रेताची विल्हेवाट

चारित्र्याचा संशय व इंडिका मोटार घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणले नाही म्हणून तुळापूर (ता. राहुरी) येथे विवाहितेच्या डोक्यात मारून नंतर विष पाजून तिचा खून

| July 10, 2013 01:32 am

विवाहितेचा खून करून प्रेताची विल्हेवाट

चारित्र्याचा संशय व इंडिका मोटार घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणले नाही म्हणून तुळापूर (ता. राहुरी) येथे विवाहितेच्या डोक्यात मारून नंतर विष पाजून तिचा खून करण्यात आला. नंतर विहिरीत प्रेत टाकण्यात आले.
तुळापूर येथील वैशाली गोविंद हारदे (वय ३०) या विवाहितेच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तिचा नवरा गोविंद सर्जेराव हारदे, सासरा सर्जेराव विठोबा हारदे, सासू कमलाबाई सर्जेराव हारदे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.
वैशाली हारदे हिच्या चारित्र्यावर सासरचे लोक नेहमी संशय घेत. तिचा छळ करीत. इंडिका मोटार घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे म्हणूनही तिचा छळ केला जात होता. पैसे आणले नाही म्हणून वैशाली हारदे हिला विष पाजून, तिच्या डोक्यात टणक वस्तूने मारून खून करण्यात आला. नंतर तिचे प्रेत घराजवळच्या विहिरीत फेकून देण्यात आले. राहुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2013 1:32 am

Web Title: murder of married women for dowry
Next Stories
1 शिक्षणाची कला प्रयत्नपूर्वक आत्मसात करणे गरजेचे- पोंक्षे
2 ऑटो क्लस्टरला केंद्राची मंजुरी
3 काँग्रेसचा विजय, राष्ट्रवादीचा पराभव आणि विरोधकांची पिछाडी
Just Now!
X