News Flash

पत्नीच्या प्रियकराचा खून; मृतदेह विहिरीत टाकला

पत्नीबरोबर अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राने दगा दिल्याचा राग मनात धरून त्याचा खून केला व मृतदेह दगड बांधून विहिरीत टाकून दिल्याप्रकरणी नामदेव मारूती माने व त्याच्या

| January 11, 2014 01:55 am

पत्नीबरोबर अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राने दगा दिल्याचा राग मनात धरून त्याचा खून केला व मृतदेह दगड बांधून विहिरीत टाकून दिल्याप्रकरणी नामदेव मारूती माने व त्याच्या तीन साथीदारांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे हा प्रकार घडला.
अर्जुन विठोबा चवरे (५१) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तो पेनूर ग्रामपंचायत समितीचा सदस्य होता. मृत चवरे व संशयित आरोपी माने यांची शेतजमीन एकमेकास लागून आहे. त्यामुळे दोघात मित्रत्वाचे संबंध होते. मित्रत्वाच्या नात्यातून दोघांचे एकमेकाच्या घरी येणे-जाणे होते. चवरे याने माने यास काही महिन्यांपूर्वी दहा हजारांची रक्कम उधारीने दिली होती. दरम्यान, नामदेव माने याच्या पत्नीबरोबर अर्जुन चवरे याचे अनैतिक संबंध निर्माण झाले. हे अनैतिक संबंध प्रकाशात येताच नामदेव माने संतापला. यातूनच त्याने मित्र चवरे याचा काटा काढण्याचे ठरविले.
दरम्यान, चवरे हा अचानकपणे गायब झाला. त्याचा शोध घेतला असता कोठेही आढळून आला नाही. तथापि, गावातीलच भारत भानुदास चवरे यांच्या विहिरीत चवरे याचा मृतदेह आढळून आला. पाठीवर तीक्ष्ण हत्याराने वार झाल्याची खूण होती. नामदेव माने यानेच आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने हा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत टाकल्याचे दिसून आले. मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे हे पुढील तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 1:55 am

Web Title: murder of wifes lover body thrown well
टॅग : Solapur,Well
Next Stories
1 शहरासाठी स्वतंत्र एक्सप्रेस फीडर
2 पशुबळी झाल्यास नव्या कायद्यानुसार कारवाई
3 सांगली पालिका अधिका-यांचे मदन पाटील यांना साकडे
Just Now!
X